Visa Rules For Foreign Workers: भारतातून कामाच्या शोधात असलेले अनेक लोक व्यवसाय आणि नोकरीसाठी सौदी अरेबियात जातात. आता सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल करुन व्हिसा नियम अधिक कडक करण्याचा प्रयत्न केला आहे. सौदी अरेबियाच्या या पावलाचा भारतातील लोकांवरही मोठा परिणाम होणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या अधिकृत वेबसाइट 'सौदी गॅझेट'नुसार, सौदी सरकार परदेशी कामगारांच्या भरतीसाठी व्हिसा देण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे.
दरम्यान, सौदी अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांनुसार अविवाहित पुरुष किंवा महिलांना सौदी अरेबियामध्ये कामासाठी नियुक्त करणे कठीण होणार आहे. नवीन नियमांनुसार, आता कोणताही अविवाहित सौदी नागरिक वयाची 24 वर्षे पूर्ण केल्यानंतरच परदेशी नागरिकाला घरगुती कामासाठी ठेवू शकतो. या अटींची पूर्तता केल्यानंतरच सौदी सरकार परदेशी कर्मचाऱ्यांना व्हिसा देईल.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियामध्ये सुमारे 26 लाख भारतीय काम करतात. आता सौदी अरेबियात 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अविवाहित नागरिकांच्या घरी भारतीयांसह परदेशी कामगारांना घरगुती नोकर म्हणून काम करता येणार नाही. सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कामाच्या शोधात सौदी अरेबियात जातात, त्यापैकी बरेच कामगार 24 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
अखेर सौदी सरकारने असे पाऊल का उचलले? सौदी अरेबियाने देशांतर्गत श्रम बाजार सुव्यवस्थित आणि नियमन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अनेक अहवाल सांगतात. सौदीच्या मानव संसाधन मंत्रालयाने ग्राहकांसाठी मुसेंड प्लॅटफॉर्म देखील स्थापित केला आहे. इथे त्यांचे अधिकार, कर्तव्ये आणि संबंधित कार्ये स्पष्ट केली जातील. या व्यासपीठाच्या माध्यमातून कामगारांना व्हिसा देण्याची आणि कामगारांमध्ये वाटाघाटी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.