Saudi Arabia Lift Ban On Jordan: पाकिस्ताननंतर जॉर्डनला सौदीचा आधार, मेंढ्या विकून होणार मालामाल!

Saudi Arabia lift ban on Import: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षणात हे समोर आले होते की, पाकिस्तान गाढवांची निर्यात करुन कसा भरपूर पैसा कमावत आहे.
Jordan-Saudi Arabia Sheep Trade
Jordan-Saudi Arabia Sheep TradeDainik Gomantak

Saudi Arabia Lift Import Ban: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षणात हे समोर आले होते की, पाकिस्तान (Pakistan) गाढवांची निर्यात करुन कसा भरपूर पैसा कमावत आहे. पाकिस्ताननंतर आता जॉर्डनबाबतही अशाच बातम्या येत आहेत.

खरे तर, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) या वर्षाच्या सुरुवातीला जॉर्डनमधून मेंढ्यांच्या आयातीवर घातलेली बंदी उठवली आहे. याचा मोठा फायदा जॉर्डनला होणार आहे. जॉर्डन दरवर्षी सुमारे दहा लाख मेंढ्यांची निर्यात करतो.

जॉर्डनचे कृषी मंत्री खालिद हनीफत यांनी जाहीर केले आहे की, सौदी अरेबियाने मेंढ्यांच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे.

कृषी मंत्रालयाच्या निवेदनानुसार, खालिद हनीफत म्हणाले की, सौदीकडून मिळालेल्या प्रतिसादाचे आणि थेट मदतीचे आम्ही कौतुक करतो, ज्याचा स्थानिक मेंढीपालनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Jordan-Saudi Arabia Sheep Trade
TTP in Pakistan: पाकिस्तानचे तुकडे? बलूचिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्याचा पाकिस्तानी तालिबानचा दावा

मेंढ्या विकून जॉर्डन श्रीमंत होणार!

अहवालानुसार, जॉर्डनने या संदर्भात आपल्या देशातील मेंढीपालकांना मदत करण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या तयारीवर भर दिला. सौदी अरेबियाच्या तांत्रिक तपासणी पथकाने योग्य मानल्यानंतर बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सौदी अरेबियाने बंदी का घातली?

विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने जॉर्डनमधून मेंढ्यांच्या आयातीवर बंदी घातली होती, कारण जॉर्डनच्या अल हलबत आणि अल धुलील जिल्ह्यांतील गुरांमध्ये पाय आणि तोंडाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे.

Jordan-Saudi Arabia Sheep Trade
Pakistan Political Crisis: आता पाकिस्तानातील पत्रकार निशाण्यावर, लष्कराविरोधात बोलणाऱ्यांना...

दरवर्षी 1 दशलक्ष मेंढ्यांची निर्यात होते

जॉर्डनच्या सांख्यिकी विभागाच्या अहवालानुसार, जॉर्डन दरवर्षी सुमारे दहा लाख मेंढ्यांची निर्यात करते, त्यापैकी निम्म्याहून अधिक मेंढ्यांची सामान्यतः आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. सौदी अरेबिया हा मेंढ्यांचा सर्वात मोठा आयातदार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com