Bashar al-Assad & Mohammed bin Salman Al Saud Dainik Gomantak
ग्लोबल

Islamic Countries: इस्लामिक जगतात मोठी घडामोड, सौदी अरेबिया 'या' कट्टर शत्रूशी करणार हातमिळवणी!

Saudi Arab-Syria Ties: सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मात्र दुसरीकडे, इस्लामिक जगताच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

Manish Jadhav

Islamic Countries: सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मात्र दुसरीकडे, इस्लामिक जगताच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

इराणनंतर आता सौदी अरेबिया सीरियाशी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यासाठी चर्चा करत आहे. सौदी अरेबियाच्या माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली.

एक दशकापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या कार्यकाळात सौदी अरेबियाने सीरियासोबतचे संबंध तोडले होते. दोघांचे दूतावासही बंद होते.

आता, दोन्ही देशांनी जुन्या गोष्टी विसरुन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच दोन्ही देश दूतावासही पुन्हा सुरु करणार आहेत.

सौदी अरेबियाने इराणसोबत मतभेद विसरुन हे काम केल्याचे बोलले जात आहे. इराण सातत्याने सीरियाला मदत करत आला आहे. याच कारणामुळे सौदी अरेबियाने त्याच्यापासून फारकत घेतली होती.

आता इराणने सौदी अरेबियाशी (Saudi Arabia) संबंध पुन्हा स्थापित केल्याने सीरियानेही या संबंधांना नवा आयाम देण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन सरकारी चॅनेल अल-एखबरिया म्हणाले की, "सीरिया आणि सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांमध्ये राजनैतिक संबंध पुनर्संचयित करण्यावर चर्चा सुरु आहे."

सुन्नी आणि शिया जमातचे नेतृत्व करणाऱ्या या दोन देशांची जवळीक केवळ इस्लामिक देशांसाठीच नाही तर जागतिक राजकारणासाठीही टर्निंग पॉइंट ठरु शकते.

विशेष म्हणजे, 2011 मध्ये सीरियात (Syria) गृहयुद्ध सुरु झाले होते. यानंतर इस्लामिक देशांनी त्याला एकटे सोडले. पण आता पुन्हा सीरिया मध्यपूर्वेत सामील होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईदनंतर म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देश दूतावास उघडू शकतात.

कतार, अमेरिका आणि सौदी हे देखील सीरियाविरोधी विविध गटांना पाठिंबा देत आहेत. आता सौदी अरेबियाने बाजू बदलली आहे, त्यानंतर परिस्थितीत बदल दिसून येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT