Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: रमजानसाठी नियमावली जाहीर; जगभरातील मुस्लीमांनी...

Saudi Arabia: लाऊडस्पीकरपासून ते इतर अनेक पारंपारिक बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia: सौदी अरेबियाने रमजानच्या सणासाठी महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. रमजान मध्ये काय करायचे, काय नाही याची नियमावली जाहीर केली आहे. लाऊडस्पीकरपासून ते इतर अनेक पारंपारिक बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

आता सौदी अरेबियाच्या या नवीन निर्णयावर जगभरातील मुसलमानांनी नाराजी व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने रमजानच्या पवित्र सणासाठी 10 सूत्री नियमावली जाहीर केली आहे.

मज्जीदमध्ये इफ्तार केला जाणार नाही, लाऊडस्पीकरवर बंदी , नमाज ब्रॉडकास्ट करण्यावर बंदी घातली आहे. नमाजसाठी मज्जीदमध्ये येणाऱ्या लोकांना लहान मुलांना मज्जीदमध्ये घेऊन येण्यासाठी मनाई केली आहे. इफ्तारसाठी वर्गणी गोळा करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने तयार केलेल्या नियमावलीवर देशभरातील मुस्लीमां( Muslim )नी मोठी टीका केली आहे. त्यांनी टीका करताना म्हटले आहे की, सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान हे सार्वजनिक जीवनात इस्लामचा प्रभाव कमी करत असल्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या सरकारने म्हटले आहे की हे सगळे आरोप चुकीचे आहेत. सरकार इफ्तारवर बंदी घालत नसून इफ्तारची व्यवस्था जास्त सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मज्जिदची पवित्रता आणि स्वच्छता राखण्यास मदत होईल असे सौदी अरेबियीयाच्या सरकारने म्हटले आहे.

मोहम्मद बिन सलमान क्राऊन प्रिन्स बनल्यापासून सौदी अरब( Saudi-Arabia ) व्हीजन 2030 वर काम करत आहे. या व्हीजननुसार इतर देशांसोबत स्पर्धा करण्यासाठी सातत्याने रुढीपरंपरा बदलण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Goa Live News: गोवा पोलिसांकडून विवादास्पद कार्यक्रम रद्द! 'कामासूत्र आणि ख्रिसमस' कार्यक्रमाच्या आयोजकांना निर्देश

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

SCROLL FOR NEXT