Crime News  Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: वडिलांचा गळा चिरुन मृतदेहाचे केले तुकडे, अमेरिकन नागरिकाला सौदीत फाशीची शिक्षा

Saudi Arabia: सौदी अरेबिया एकीकडे सुंदर शहरे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध मानले जाते, तर दुसरीकडे येथे लागू असलेले कायदे अतिशय कडक मानले जातात.

Manish Jadhav

Saudi Arabia: सौदी अरेबिया एकीकडे सुंदर शहरे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध मानले जाते, तर दुसरीकडे येथे लागू असलेले कायदे अतिशय कडक मानले जातात. बुधवारी सौदी अरेबियात एका अमेरिकन नागरिकाला फाशी देण्यात आली.

या व्यक्तीवर वडिलांच्या हत्येचा आरोप होता. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची ओळख बिशोय शरीफ नाझी नसीफ अशी करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीने आधी त्याच्या इजिप्शियन वडिलांची हत्या केली.

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) गृह मंत्रालयाने सांगितले की, नसीफने काही अंमली पदार्थांचा वापर केला होता. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे केले. अटक होण्यापूर्वीच शरीफ इतर लोकांना मारण्याचा प्रयत्न करत होता.

नसीफला फाशी देण्यात आली

दरम्यान, नसीफला फाशी कशी देण्यात आली हे अधिकृतपणे सांगण्यात आले नाही, परंतु सौदी अरेबियामध्ये शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा शिरच्छेद करण्याची प्रथा आहे. \

त्याचवेळी, आरोपीच्या (Accused) वकिलाची ओळख पटू शकली नाही. याशिवाय नसीफचे घर अमेरिकेत आहे की नाही हे देखील कळू शकलेले नाही.

दुसरीकडे, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की त्याला फाशी देण्यापूर्वी अमेरिकेचे राजनयिक जुलैमध्ये शरीफ यांना भेटायला गेले होते. मात्र, त्याच्या अटकेबाबत काहीही चुकीचे आढळले नाही. सौदी अरेबियाने एका अमेरिकन नागरिकाला फाशी दिली आहे.

सर्वाधिक फाशी देणारा देश

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार, चीन आणि इराणनंतर सौदी अरेबिया हा जगातील असा देश आहे, जिथे सर्वाधिक फाशीची शिक्षा दिली जाते. मात्र, कोरोना महामारीच्या काळात या देशांमध्ये फाशी देणे कमी झाले होते.

परंतु, कोरोनाचा धोका कमी झाल्याने फाशी देण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च 2022 मध्ये एकाच दिवसात 81 जणांना फाशी देण्यात आली. सौदीच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक फाशी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moon Eclipse: खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण! गोव्याच्या आकाशात लाल चंद्र दिसणार का?

Ganesh Visarjan: ..गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला! ‘पणजीच्‍या राजा’ची भव्‍य मिरवणूक; राजधानीत ढोल-ताशांचा दणदणाट

Ministers Wealth: देशातल्या मंत्र्यांकडे पैसेच पैसे! भाजपमध्ये 14 अब्जाधीश, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर; वाचा ADR Report

Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

Goa Live Updates: शिरोडा येथे शुक्रवारी रात्री अंदाजे १० जणांनी ऋणाल केरकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT