Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: रमजानच्या महिन्यात दशकानंतर सौदी अरेबियाने जगाला आश्चर्यात टाकणारे केले काम

Saudi Arabia: हा आकडा 2021च्या तुलनेत दुप्पट आहे.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia: रमजान हा सण मुस्लिम समुदायासाठी आणि इस्लामिक देशांसाठी अतिशय महत्वाचा आहे. रमजान महिन्यात इस्लामिक देश अनेक नियम पाळतात. आता अनेक वर्षानंतर सौदी अरेबियाने असे काही काम केले आहे की ज्याने जगाला आश्चर्यात टाकले आहे.

सौदी अरेबियाने रमजानच्या पवित्र महिन्यात एका नागरिकाला मृत्यूची शिक्षा दिली आहे. अनेक वर्षानंतर सौदी अरेबियाने रमजानच्या महिन्यात नागरिकाला मृत्यूची शिक्षा दिल्याचे मानवीधिकारी समूहाने म्हटले आहे. इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मदीनामध्ये ही मृत्यूची शिक्षा दिल्याची माहीती समोर आली आहे.

या व्यक्तीने दुसऱ्या एका नागरिकाचा चाकूने वार करुन हत्या केली होती. त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आल्याचे सौदी अरेबियाची प्रेस एजन्सीने 28 मार्चला रमजानच्या 5व्या दिवशी मृत्यूदंड दिल्याचे सांगितले आहे.

  • सौदी अरेबियाने याआधी केव्हा दिली होती शिक्षा?

2009 हे सौदी अरेबियाने रमजानच्या महिन्यात शिक्षा दिलेले शेवटचे वर्ष ठरले होते. सगळ्यात जास्त मृत्यूची शिक्षा देणाऱ्या देशांपैकी सौदी अरेबिया हा एक देश आहे. आता 2009 नंतर आता शिक्षा दिल्यानंतर सर्व देश आश्चर्य व्यक्त करत आहेत. आत्तापर्यंत रमजानच्या पवित्र महिन्यात 17 लोकांना मृत्यूची शिक्षा दिली आहे.

समाचार एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 2022मध्ये 147 लोकांना मृत्यूदंड दिला आहे. हा आकडा 2021च्या तुलनेत दुप्पट आहे. 2021मध्ये 69 लोकांना मृत्यूदंड दिला होता.

  • या अपराधांसाठी दिली जाते मृत्यूची शिक्षा

सौदी अरेबियामध्ये ड्रग्ज सारख्या अपराधामध्येदेखील मृत्यूची शिक्षा दिली जाते. ३ वर्षाआधी यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षापासून पून्हा ड्रग्ज( Drugs )मध्ये अपराधी असणाऱ्यांना मृत्यूची शिक्षा दिली जात आहे.

दरम्यान, 2022मध्ये सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत हत्या आणि लोकांचे जीवन धोक्यात टाकणाऱ्या अपराधांना सोडून सौदी अरबने मृत्यूच्या शिक्षेपासून सुटकारा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

Nikolai Patrushev Goa visit: गोव्याच्या सागरी क्षेत्रातील प्रगतीची रशियाकडून प्रशंसा! रशियाचे राष्ट्रपती साहाय्यक निकोलाईंनी दिली भेट

IFFI 2025: 'गोव्यात या, चित्रीकरण करा'! CM सावंतांचे आवाहन; राज्‍याला चित्रपट निर्मिती हब बनवण्‍याचे स्‍वप्‍न

SCROLL FOR NEXT