Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia ची अर्थव्यवस्था मोठ्या बदलाच्या वाटेवर, 'आता फक्त तेलच नाही तर...'

Saudi Arabia: सौदी अरेबिया पूर्वीपासूनच तेलसाठ्यामुळे श्रीमंत देश आहे.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia: सौदी अरेबिया पूर्वीपासूनच तेलसाठ्यामुळे श्रीमंत आहे. आता त्याला उत्पन्नाचा आणखी एक मोठा स्रोत मिळाला आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेत भविष्यात मोठे बदल होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. किंबहुना, राजधानी रियाधमध्ये नवीन अब्दुलसलाम अलमाजेद 300 अपार्टमेंट्सची जलद विक्री हे सूचित करते की, प्रमुख तेल उत्पादक मालमत्तेच्या बाबतीतही मागे राहणार नाही.

दरम्यान, एका महिन्याच्या आत, रोख पेमेंटवर 300 अपार्टमेंट विकले गेले. विशेष म्हणजे, या अपार्टमेंटसाठी कंपनीने जाहिरातही दिली नव्हती. एका अपार्टमेंटची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्माजेदचे सीईओ अब्दुलसलाम अलमाजेद म्हणाले की, 'क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सुरु केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश देशाला पुन्हा आकार देणे आहे.'

अल्माजेद पुढे म्हणाले, 'आता नागरिकांची (Citizens) मतं बदलत आहेत. पूर्वी लोक उंच भिंती आणि छोट्या खिडक्या असलेल्या घरात राहत असत. परंतु आता त्यांना मोकळ्या जागेची गरज भासू लागली आहे. लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. हे फ्लॅट बनवताना सौदी अरेबियाची (Saudi Arabia) वास्तुकला आणि सर्जनशीलता वापरली गेली आहे.'

तसेच, मोहम्मद बिन सलमान सत्तेत आल्यापासून अनेक सुधारणा झाल्या आहेत. महिलांना (Women) अधिका-अधिक सूट मिळू लागली आहे. पूर्वी परिस्थिती अशी होती की, अनेक जमीनदार महिलांना भाड्याने घरे देण्यास टाळाटाळ करत असत. स्त्री जीवनाचे सर्व निर्णय पुरुषांच्या हातात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT