Crown Prince Mohammed bin Salman Dainik Gomantak
ग्लोबल

सौदी क्राउन प्रिन्स 'सनकी अन् किलर', गुप्तचर अधिकाऱ्याचा दावा

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे मनोरुग्ण असल्याचा दावा सौदी अरेबियाच्या माजी गुप्तचर प्रमुखाने केला आहे.

दैनिक गोमन्तक

Crown Prince Mohammed bin Salman: क्राउन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान हे मनोरुग्ण असल्याचा दावा सौदी अरेबियाच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने केला आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएस न्यूजवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. सौदी अरेबियाच्या गुप्तचर विभागात क्रमांक दोनवर असलेले साद अल्जबारी म्हणाले की, 'मुहम्मद बिन सलमान हे आगामी काळात अमेरिका (America) आणि इतर देशांसाठी मोठे आव्हान बनू शकतात.' क्राऊन प्रिन्स हा हत्यारा असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, मुहम्मद बिन सलमानची 'टायगर स्क्वाड' नावाची खतरनाक लोकांची टोळी असल्याचा दावाही साद यांना केला आहे. यातून अपहरण, खून केले जातात. "मध्य आशियात एक मोठे आव्हान बनलेल्या एका विक्षिप्त, खुन्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी इथे आलो आहे," असे त्यांनी रविवारी प्रसारित केलेल्या मुलाखतीत म्हटले. तो अमेरिकन आणि संपूर्ण जगासाठी धोका बनू शकतो.

ते पुढे म्हणाले की, 'तो असा मनोरुग्ण आहे, ज्याला कोणाबद्दलही सहानुभूती नाही. त्याला काही भावना नाहीत. त्याच्या अत्याचाराचा आणि गुन्ह्यांचा मी साक्षीदार आहे.' अल्जबारी हे मोहम्मद बिन नायफ यांचे दीर्घकाळ सल्लागार होते. जून 2017 पर्यंत ते सौदीचे क्राऊन प्रिन्सही होते. त्यानंतर मुहम्मद बिन सलमान क्राऊन प्रिन्स झाले.

दुसरीकडे, अल्जबारी यांना जीव वाचवण्यासाठी कॅनडाला (Canada) जावं लागलं. अल्जबारी यांनी वॉशिंग्टन डीसी न्यायालयात (Court) सांगितले की, 'मुहम्मद बिन सलमानने टोरंटोला एक पथक पाठवले होते. याच्या दोन आठवड्यांपूर्वी सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांची इस्तंबूलमध्ये हत्या करण्यात आली होती. माझ्याकडे राजघराण्याबद्दल आणि सरकारबद्दल काही महत्त्वाची माहिती असल्यामुळे माझी हत्या होऊ शकते. जोपर्यंत तो मला मेलेला पाहत नाही तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT