Russia's Nuclear Bomber  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Deployed Nuclear Bomber: रशियाने तैनात केले 11 न्युक्लियर बॉम्बर; उपग्रह छायाचित्रातून आले समोर

युरोपवर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका; नाटो राष्ट्रांच्या सीमेवर रशियाच्या हालचाली गतिमान

गोमन्तक डिजिटल टीम

Russia Deployed Nuclear Bomber: रशियाचे राष्ट्राध्यठक्ष व्लादिमिर पुतीन यांनी फिनलँड आणि नॉर्वे या नाटो राष्ट्रांच्या सीमेवर 11 न्युक्लियर बॉम्बर तैनात केले आहेत. ब्रिटिश वर्तमानपत्र ‘द मिरर’ ने उपग्रह छायाचित्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. त्यामुळे पुतीन युरोपमधील राष्ट्रांवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा कट रचत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकतेच पुतीन आणि रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ, असे वक्तव्य केले होते. 7 ऑक्टोबर रोजी ही छायाचित्रे घेतली गेली आहेत. यात 11 न्युक्लियर बॉम्बर दिसून येतात. त्याचा वापर पारंपरिक शस्त्रांस्त्रांसाठीही केला जातो.

नॉर्वेची फॅक्ट चेकिंग वेबसाइट Faktisk.no ने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपुर्वीच इस्त्रायलचे वर्तमान पत्र ‘यरूशलम पोस्ट’ने देखील असाच दावा केला होता. इस्त्रायलच्या एका गुप्तचर यंत्रणेने देखील याला दुजोरा दिला होता.

एरवी रशियाचे न्युक्लियर बॉम्बर्स राजधानी मॉस्कोपासून 450 किलोमीटरवर असलेल्या एंगल्स हवाईतळवर तैनात असतात. पण हे बॉम्बर्स आता तिथून हटवून फिनलँड आणि नॉर्वेच्या सीमेवर आणले गेले आहेत.

याच वर्षी फेब्रुवारीत रशियाच्या दोन लढाऊ विमानांना ब्रिटनच्या हवाई हद्दीत ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी स्कॉटलंड परिसरात घेरले होते. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव होता. त्यामुळे ब्रिटिश गुप्तचर खात्याने रशियाच्या हालचालींवर बारिक नजर ठेवले आहे.

रशिया सध्या युक्रेनवर पुर्ण ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, युद्धाला सात महिने उलटूनही रशियाला युक्रेनवर निर्णायक आघाडी मिळवता आलेली नाही. शिवाय अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रांच्या मदतीमुळे युक्रेनने आत्तापर्यंत रशियासमोर शरणागती पत्करलेली नाही. त्यामुळेही रशियाची चिडचिड होत आहे. त्यातूनच रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT