Sandstorm  Dainik Gomantak
ग्लोबल

इराकमध्ये उसळले वाळूचे वादळ; 4000 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

एप्रिलपासून इराकमध्ये आलेले हे आठवे वाळूचे वादळ आहे.

दैनिक गोमन्तक

इराकमध्ये उसळलेल्या वाळूच्या वादळाने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वाळूच्या वादळामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 4000 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोमवारी उफाळलेल्या या वादळामुळे लोकांची दमछाक उडाली. (Sand storm hits Iraq)

देशभरातील विमानतळ, शाळा आणि कार्यालये बंद होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिलपासून इराकमध्ये आलेले हे आठवे वादळ आहे. या महिन्याच्या सुरुवातीला देखील, एकाचा मृत्यू झाला होता आणि 5000 इतरांना या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या वाळूच्या वादळात श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

धुळीच्या ढगांनी झाकलेले आकाश
सोमवारी आलेले वाळूचे वादळ इतके जोरदार होते की राजधानी बगदादला धुळीच्या ढगांनी नारिंगी रंगाची चमक दाखवली. दक्षिण इराकमधील शियाबहुल नजफ आणि उत्तर कुर्दीश स्वायत्त प्रदेशातील सुलेमानियासह इतर अनेक शहरांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. इमारती, गाड्या, घरांच्या छतावर वाळू शिरली. राजधानी बगदादसह इराकच्या 18 पैकी सात प्रांतातील सरकारी कार्यालये बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वृद्ध आणि दमा आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांना उपचार करता यावेत म्हणून रुग्णालये खुली ठेवण्यात आली होती. इराकच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4,000 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. या वादळाचा त्रास ज्येष्ठांना अधिक झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT