Sam Altman Open AI CEO Marriage Dainik Gomantak
ग्लोबल

Open AI चे सीईओ Sam Altman विवाहबंधनात, जिवलग मित्र झाला आयुष्याचा जोडीदार

सॅम ऑल्टमन यांची ऑलिव्हरसोबत अनेक वर्षांपासून मैत्री आहे. ऑस्ट्रेलियन प्रोग्रामर ऑलिव्हर मुल्हेरिन हे मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

Ashutosh Masgaunde

Sam Altman, CEO of AI research lab OpenAI and former president of Y Combinator, has married his friend Oliver Mulherin:

AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन यांनी त्यांचा मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन यांच्याशी लग्न केले आहे.

एका साध्या सोहळ्यात त्यांचे हे लग्न पार पडले. 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या या विवाहसोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा एक साधा सोहळा, सर्व थाटामाटापासून दूर होता. पाहुण्यांच्या यादीत जवळचे कुटुंब आणि काही निवडक मित्रांचा समावेश होता. ऑल्टमन यांच्या निवासस्थानाजवळ हा सोहळा पार पडला.

ऑल्टमन यांनी गेल्या वर्षी आपल्या या नात्याची माहिती सार्वजनिक केली होती. एका न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ते आणि मुल्हेरिन सॅन फ्रान्सिस्कोमधील रशियन हिलवर लिव्ह इनमध्ये राहतात.

तांत्रिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी दोघांच्या लग्नाबद्दल अभिनंदन केले आहे. यामध्ये जेफ बेझोसची मंगेतर लॉरेन सांचेझ, अलेक्झांडर वांग, शेरविन पिशेवर, जेन मातोशी आणि एड्रियन औन यांच्या नावांचा समावेश आहे.

कोण आहे ऑलिव्हर मुल्हेरिन?

सॅम ऑल्टमन यांची ऑलिव्हरसोबत अनेक वर्षांपासून मैत्री आहे. ऑस्ट्रेलियन प्रोग्रामर ऑलिव्हर मुल्हेरिन हे मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवीधर आहेत.

ऑलिव्हर मुल्हेरिनने त्याच्या विद्यापीठाच्या काळात विविध AI प्रकल्पांमध्ये काम केले, ज्यामध्ये भाषा ओळख आणि खेळांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन यांची मैत्री खूप जुनी आहे. मात्र, दोघेही सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळा एकत्र दिसले आहेत. गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींच्या सन्मानार्थ आयोजित डिनरमध्ये दोघेही एकत्र दिसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT