S Jaishankar Criticized China Dainik Gomantak
ग्लोबल

''अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा आजही हास्यास्पद अन् उद्याही...''; जयशंकर यांनी ड्रॅगनवर केली सडकून टीका

S Jaishankar Criticized China: सिंगापूरच्या भूमीवरुन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला त्यांच्यात शब्दात चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Manish Jadhav

S Jaishankar Criticized China:

चीन आणि पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात पाऊले उचलत आहेत. यातच आता, सिंगापूरच्या भूमीवरुन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला त्यांच्यात शब्दात चोख प्रत्युत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितल्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचा चांगलाच समाचार घेतला. याशिवाय एस जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात दहशतवादाकडे कधीही दुर्लक्ष करु शकत नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. येथे ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहतील.

अरुणाचलवरील चीनचा दावा हास्यास्पद: जयशंकर

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनला सडेतोड प्रत्युत्तर देताना म्हटले की, "अरुणाचल प्रदेशवरील चीनचा दावा सुरुवातीला हास्यास्पद होता आणि आजही हास्यास्पद आहे, कारण तो भारताचा अविभाज्य भाग आहे." नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS) च्या इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (ISAS) येथे 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील व्याख्यान सत्रानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रादरम्यान जयशंकर यांनी हे वक्तव्य केले.

दुसरीकडे, चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांची टिप्पणी आली आहे. अलीकडेच, चिनी लष्कराने अरुणाचल प्रदेश हा चीनी भूभागाचा नैसर्गिक भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर एका निवेदनात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा खोडून काढला. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले.

पाकिस्तानचाही समाचार घेतला

शेजारी देश पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद प्रायोजित करत आहे. भारत सध्या दहशतवाद्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत नाही. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर जयशंकर म्हणाले की, "पाकिस्तान सतत काही ना काही कुरापत्या करतो. त्यामुळे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की धोक्याचा सामना करण्यासाठी आम्हाला नव्या मार्गाचा अवलंब करावा लागेल."

भारताच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, "प्रत्येक देशाला एक स्थिर शेजारी हवा आहे... दुसरे काही नाही तर किमान शांततापूर्ण शेजारी असावा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT