Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

'प्रेषित मोहम्मद यांच्या अपमानाचा बदला...', रशियात पकडला Islamic State चा दहशतवादी

Islamic State: इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आत्मघातकी हल्लेखोराला रशियाने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Islamic State: भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आत्मघातकी हल्लेखोराला रशियाने अटक केली आहे. स्पुतनिक या वृत्तसंस्थेने रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) च्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार रशियन अधिकाऱ्यांनी पकडलेला हल्लेखोर प्रमुख राजकीय नेत्यांना मारण्याची योजना आखत होता.

दरम्यान, अथॉरिटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "अटक करण्यात आलेला दहशतवादी (Terrorist) मध्य आशियाई क्षेत्रातील एका देशाचा रहिवासी आहे." त्याने भारतीय राजकीय वर्तुळातील एका नेत्यासह स्वत:ला उडवून देण्याची योजना आखली होती. या दहशतवाद्याला आयएसच्या एका नेत्याने तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते.

दहशतवादी कारवायांवर सरकारची नजर

विशेष म्हणजे, इस्लामिक स्टेट (Islamic State) आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. यासोबतच, केंद्र सरकारच्या (Central Government) बेकायदेशीर गतीविधी (Prevention) अधिनियम, 1967 च्या पहिल्या अनुसूचीमध्ये देखील त्याचा समावेश करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे

गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, IS आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी विविध इंटरनेट-आधारित सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांकडून सायबर स्पेसवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच कायद्याच्या आधारे दोषींवर कारवाईही सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT