Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

भारतात होणाऱ्या G -20 परिषदेत रशिया सहभागी होणार नाही, पुतीन यांनी दिलं युक्रेन युद्धाचं कारण

G20 Summit Big Update: भारतात होणाऱ्या G20 परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अनुपस्थित राहणार आहेत.

Manish Jadhav

G20 Summit Big Update: भारतात होणाऱ्या G20 परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अनुपस्थित राहणार आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्षांचे सर्व लक्ष लष्करी कारवायांवर आहे. त्याचवेळी, वॅगनर ग्रुपदेखील आपल्या प्रमुखाच्या मृत्यूमुळे रशियन सरकारवर नाराज आहे.

दरम्यान, पुतीन यांनी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि विमानातील लोकांप्रती शोक व्यक्त केला.

मात्र, वॅगनर ग्रुप या घटनेसाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना जबाबदार धरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पुतिन यांना धमकीही दिली आहे. त्यामुळे क्रेमलिनने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (ICC) पुतीन यांनी युक्रेनवर (Ukraine) युद्ध लादल्याचा आरोप करत अटक वॉरंट जारी केले आहे. याचा अर्थ पुतीन यांना परदेशात प्रवास करताना अटक होण्याचा धोका आहे.

पुतीन यांनी या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेला वैयक्तिकरित्या हजेरी लावली नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधला.

G20 जागतिक नेत्यांची शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियाकडून G20 चे अध्यक्षपद स्वीकारले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) हे 7 ते 10 सप्टेंबर या कालावधीत G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. या शिखर परिषदेला अनेक राष्ट्रे आणि सरकारांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT