Russian President Vladimir Putin worried about Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाला सतावतीय अफगाणिस्तानची चिंता, पुतीन यांचा सीरिया आणि इराकवर आरोप

सीरिया आणि इराकमधून दहशतवादी युद्धग्रस्त देशात प्रवेश करत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.(Afghanistan)

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) परिस्थितीवर चिंता व्यक्त करत रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी, सीरिया (Syria) आणि इराकमधून (Iraq) दहशतवादी युद्धग्रस्त देशात प्रवेश करत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पुतिन यांनी इस्लामिक स्टेट (ISI) च्या दहशतवाद्यांकडे लक्ष वेधत तालिबान (Taliban) हे सगळे गांभीर्याने घेत नाही.असा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त, पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी त्यांचे संबंध कार्यरत आणि स्थिर असल्याचे देखील सांगितले आहे . पुतीन म्हणाले, "दोन्ही नेत्यांमधील संबंध सकारात्मक आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होण्यास मदत होईल. (Russian President Vladimir Putin worried about Afghanistan)

आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेअंतर्गत आयोजित गटचर्चेत पुतीन बोलत होते.

यावेळीपुतीन म्हणाले, 'रशिया युरोपियन देशांना नैसर्गिक वायू पुरवण्यास तयार आहे. यामुळे तेथील इंधनाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. पण यासाठी त्याच्या देशाला एक निश्चित किंमत हवी आहे. तसेच पुतीन यांनी युरोपियन तज्ज्ञांचे आरोप फेटाळून लावले की रशिया गॅस पुरवठा कमी करत आहे कारण त्याला गॅसचे दर वाढवायचे आहेत.असे काही नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

या वर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक पटकावलेले पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांच्या संदर्भात पुतीन म्हणाले, "जर ते देशाचे कोणतेही कायदे मोडत नसतील आणि परदेशी एजंट म्हणून रशियाचे कोणतेही नुकसान करत नसतील तर कोणालाही त्याची भीती बाळगण्याची गरज नाही." ते रशियात आरामात राहू शकतात .

त्याचबरोबर रशियात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे ज्याने स्पुटनिक व्ही, जगातील पहिली कोरोना लस बनवल्याचा दावा केला होता त्याच देशात आता 24 तासांत 986 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनाच्या प्रारंभापासून देशात दैनंदिन मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे. रशियामध्ये मंगळवारी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 973 होती. रशियामध्ये संसर्गाच्या 7.8 दशलक्षाहून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यापैकी 219000 पेक्षा जास्त संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, युरोपमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत रशिया आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT