Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: 'पाश्चिमात्य देशांचे आर्थिक निर्बंध युद्धाच्या घोषणेसारखे'

युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्धाची घोषणा करुन 10 दिवस उलटले असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांना दम भरला आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करुन 10 दिवस उलटले असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांना दम भरला आहे. पाश्चात्य देशांचे आर्थिक निर्बंध हे युद्धाच्या घोषणेसारखे असल्याचे पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, 'युक्रेनवरील लष्करी कारवाईचा उद्देश रशियन भाषिक समुदायाचे रक्षण करणे आणि युक्रेनचे (Ukraine) निशस्त्रीकरण करुन नाझी घटकांचे उच्चाटन करणे हा आहे. जेणेकरुन देश तटस्थ राहील.' (Russias President Vladimir Putin Has Said That Western Economic Sanctions Are like A Declaration Of War)

दरम्यान, युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्या या आरोपांचा सातत्याने हल्ल्याचे निमित्त म्हणून वापर केला आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी मॉस्कोवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यात पुतिन आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी या आर्थिक निर्बंधांवर कठोर टीका केली आहे.

तसेच, पुतिन यांनी मॉस्कोमधील एरोफ्लॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये महिला फ्लाइट अटेंडंटच्या गटाला ही माहिती दिली. तथापि, NATO सातत्याने युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लादण्याचा निर्णय नाकारत आहे. यामुळे युक्रेनबाहेर युद्ध पसरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, 'रशियन सैन्य सर्व उद्दिष्टे साध्य करतील यात कोणतीच शंका नसावी. सर्व काही योजनेनुसार घडत आहे.'

शिवाय, रशियामध्ये मार्शल लॉ किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आणीबाणी लागू केली जाण्याची शक्यताही पुतीन यांनी फेटाळून लावली. ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा मोठा बाह्य किंवा अंतर्गत धोका असतो तेव्हाच मार्शल लॉ किंवा आणिबाणी लावण्यात येते. याची आता काही गरज भासत नाही.' विशेष म्हणजे रशियामध्येही युक्रेनवर झालेल्या हल्ल्याबाबत निदर्शने होत आहेत. रशियन सरकार या आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT