Russia-Ukraine War:...मग मध्य युरोपचे अस्तित्व संपेल का?

रशियाने (Russia) युक्रेनचा झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

रशियाने युक्रेनचा (Ukraine) झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. युरोपातील या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पाच्या बाहेरील भागाला लागलेल्या आगीमुळे जगात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता आग आटोक्यात आणण्यात आली आहे. चेर्नोबिल अणुप्रकल्पातून ते बऱ्यापैकी सुरक्षित केले गेले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत एखादी छोटीशी ठिणगी मध्य युरोपसाठी कधीही मोठी संकट बनू शकते. या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा (Russia) ताबा का आहे, आणि त्याच्या सुरक्षेतील त्रुटी काय आहेत ते जाणून घेऊया...

चिंता कमी झालेली नाही: अणु सुरक्षा तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने झापोरिझिया अणुउर्जा प्रकल्प सध्या धोक्याच्या बाहेर असल्याचे म्हटले आहे. झापोरिझियाची रचना चेर्नोबिलपेक्षा वेगळी आहे. त्याची सुरक्षा व्यवस्था बरीच प्रगत असून आगीपासून सुरक्षित ठेवू शकते. तथापि, ओबामा प्रशासनाच्या काळात नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलवर वरिष्ठ संचालक म्हणून काम केलेल्या जॅन वुल्फस्टॉल यांनी म्हटले आहे की, 'अणु संयंत्राजवळील युद्ध कारवायांमुळे कधीही मोठा अनर्थ घडू शकतो.'

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: रशियामध्ये फेसबुकसह मीडिया वेबसाइट्स झाल्या डाऊन

युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प: झापोरिझिया अणुउर्जा प्रकल्प हा युक्रेनच्या चार अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे, जो एकत्रितपणे देशाला सुमारे 20 टक्के उर्जा पुरवतो.

क्रिमियाच्या अगदी जवळ: हा पॉवर प्लांट क्रिमियापासून फक्त 200 किमी अंतरावर आहे. क्रिमिया हा तोच प्रदेश आहे, जो रशियाने 2014 मध्ये युक्रेनमधून (Ukraine) ताब्यात घेतला होता.

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: रशियामध्ये फेसबुकसह मीडिया वेबसाइट्स झाल्या डाऊन

त्यामुळे विनाशाची चिंता: रशियाच्या झापोरिझियावरील हल्ल्यानंतर त्याच्या बाह्यभागाला आग लागली होती, परंतु ती विझवण्यात आली आहे. ही आग विझवण्यात आली नसती तर अणुभट्टीलाही आग लागली असती. यामुळे प्लांटमध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तथापि, अणुऊर्जा तज्ज्ञांच्या मते, इथे स्फोट झाला असता तर तो चेर्नोबीलमधील अपघातापेक्षा 10 पट अधिक भयावह असता. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात 1986 मध्ये स्फोट घडला होता. चेन्रेबिलमध्ये फक्त एका युनिटमुळे इतका विनाश झाला होता. झापोरिझियाच्या सहा युनिटला स्फोटाचा फटका बसला असता तर संपूर्ण मध्य युरोप (Central Europe) उद्ध्वस्त होऊ शकला असता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com