Vladimir Putin 

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

जाणून घ्या, टॅक्सी चालवणाऱ्या रशियन राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कहाणी

1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर (Soviet Union) टॅक्सी ड्रायव्हर (Vladimir Putin as Taxi Driver) म्हणून काम करण्याची वेळ आली, असल्याची कबुली रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत. मात्र मास्कोच्या रस्त्यावर त्यांना टॅक्सी चालक म्हणून काम करावे लागले. यासंबंधीचा खुलासा खुद्द पुतिन यांनीच केला आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर (Soviet Union) टॅक्सी ड्रायव्हर (Vladimir Putin as Taxi Driver) म्हणून काम करण्याची वेळ आली असल्याची कबुली रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. हा आर्थिक आव्हानांचा काळ असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यामुळे पुतीन यांना टॅक्सी चालक म्हणून काम करावे लागले. याबद्दल बोलणे अप्रिय आहे, परंतु दुर्दैवाने ते देखील असल्याचे पुतीन यांनी म्हटले.

सोव्हिएत युनियनच्या पतनाबद्दल बोलताना पुतीन पुढे म्हणाले, कम्युनिझमच्या पतनाने बरेच काही गमावले. अन् यामुळेच रशियाचा अंत झाला. पुतिन पुढे म्हणाले, 'सोव्हिएत युनियनच्या नावाखाली रशियाचे विघटन करण्यात आले. आम्ही पूर्णपणे वेगळ्या देशाचे नागरिक बनलो. 1,000 वर्षात ज्या ऐतिहासिक वारसाची जपणूक करण्यात आली होती त्याची विटंबना करण्यात आली. ही एक मोठी मानवी शोकांतिका होती.' सोव्हिएत युनियन हे पूर्व युरोप आणि मध्य आशियाई देश मिळून बनले होते. मात्र त्याचे विघटन झाल्यानंतर युक्रेन, बेलारुस, कझाकस्तान हे देश जगाच्या नकाशावर अवतरले.'

रशियन मंत्र्याने आण्विक युद्धाचा इशारा दिला

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात रशियन सैन्य तेथे जमल्याने युक्रेनच्या सीमेवर रशियन हल्ल्याची शक्यता वाढत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील अशांततेवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी 1962 च्या क्युबन क्षेपणास्त्र संकटाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आण्विक युद्धाचा देखील इशारा दिला आहे.

युक्रेनच्या सीमेवर 90 हजार सैनिक तैनात

काळ्या समुद्रातील नौदल तणाव, तसेच व्होरोनेझ प्रदेशात लष्कराच्या टाक्या आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली असल्याच्या उपग्रह फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे. स्पेस फर्म मॅक्सर टेक्नॉलॉजीजने युक्रेनियन सीमेपासून 200 मैलांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या स्मोलेन्स्क जिल्ह्यात तैनात असलेल्या कथित रशियन सैन्य दलाचे फोटो देखील जारी केले. गुप्तचर अहवालातून असे दिसून आले आहे की, आता किमान 90,000 रशियन सैन्य, जड तोफखाना आणि टाक्यांसह सीमेवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT