Russia and Ukraine Latest Update Dainik Gomantak
ग्लोबल

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध केले घोषित

युक्रेनियन येथील छीव आणि खार्किव या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असुन, गोव्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्याची होत आहे मागणी

दैनिक गोमन्तक

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केले असुन युक्रेनियन येथील छीव आणि खार्किव या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, रशियन आक्रमणाची सुरुवात झाल्याचे वृत्त संस्थांनी दिले आहे. युक्रेनच्या पूर्व भागात लष्करी कारवाई करण्याचे आज व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले होते. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिनयांनी युक्रेनवर युद्ध घोषित केले (Russia and Ukraine Latest Update)

गोव्यातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुरक्षितपणे गोव्यात परत आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी एनआरआय आयुक्त सवाईकर यांनी विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याकडे काल केली होती. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे गोव्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नागरिकांची जबाबदारी आपली असुन, त्यांना लवकरात लवकर राज्यात परत आणणे गरजेचे आहे.

भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू

युक्रेन (Ukraine) आणि रशियाच्या सीमेवरील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गंभीर परिस्थिती पाहता, एअर इंडियाच्या (Air India) पहिल्या विमानाने मंगळवारी रात्री 242 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात आले. मायदेशी परतलेल्या या भारतीयांनी युक्रेनमधील परिस्थितीही सांगितली आहे.

युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय नागरिक

युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय (Indian) नागरिक आहेत. भारत सरकारने सर्व नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. आलेल्या 242 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनला गेले आहेत. युक्रेनमधून मायदेशी परतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना भारतात नवीन जीवन मिळाल्याचे वाटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update: तिन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल 'ढवळीकरांना' खात्री

SCROLL FOR NEXT