putin 1.jpg 
ग्लोबल

भारत-चीन सीमाविवादावर रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणाले...

गोमंन्तक वृत्तसेवा

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना शनिवारी भारत आणि चीन यांच्यातील तणावासंबंधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) यांनी आपले मत मांडले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी (narendra modi) आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग (Xi Jinping) हे दोन्हीही जबाबदार नेते आहेत. तसेच भारत-चीन सीमाविवादावर (Indo-China border dispute) तोडगा काढण्यासाठी सक्षम नेते आहेत. जगातील कोणत्याही इतर देशांनी या दोन देशांच्या सीमाविवादात हस्तक्षेप करु नये.(Russian President Putin on India China border dispute said)

जगातील विकसित देशांचा समूह असणाऱ्या क्वाड वर टिका करताना पुतीन म्हणाले, कोणत्याही देशाने इतर देशांच्या प्रश्नासंबंधी सहभागी होत असताना त्या गोष्टीचे पूर्ण आकलन केले पाहिजे. द्विपक्षीय संबंध निर्माण करताना त्या दोन्ही देशांनी कितीपर्यंत संबंध वाढवले पाहिजेत यासंबधीचा विचार त्या दोन्ही देशांनी केला पाहिजे. तसेच द्विपक्षीय संबंध निर्माण करत असताना इतर देशांच्या विरोधात त्या संबंधाचा वापर करण्यात येऊ नये, असेही पुतीन म्हणाले.

चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांनी म्हटले होते की, क्वाड देशांचा गट हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बनवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुतीन यांना भारत-चीन यांच्या सीमाविवादाबद्दल विचारले असता, दोन शेजारी देशामध्ये अशाप्रकारचे सीमा विवाद असतातच.

पुतीन पुढे म्हणाले, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग जबाबदार नेते असून ते द्विपक्षीय संबंधाबद्दल ज्यावेळीही भेटतात त्यावेळी पूर्ण सन्मानपूर्वक भेटतात. मला विश्वास आहे की, कोणत्याही प्रकारची कठीण परिस्थिती येऊ त्यातून मार्ग काढण्यासाठी हे दोन्ही नेते सक्षम आहेत. मात्र या दोन्ही देशांच्या सीमाविवादामध्ये इतर कोणत्याही देशाने हस्तक्षेप करु नये.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT