Russian Girl

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

पाकिस्तानी मित्राच्या शोधात रशियन तरुणी पोहोचली मुलतानमध्ये!

पाकिस्तानमधील मुलतानमध्ये (Multan) एका रशियन महिलेने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील मुलतानमध्ये (Multan) एका रशियन महिलेने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महिला आपल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात (Pakistan) आली होती, मात्र मित्राला भेटू न शकल्याने तिने हे आत्मघाती पाऊल उचलले.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने ही घटना समोर आली आहे. करिस्टिना मर्कुलोवा असे या रशियन महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 30 डिसेंबरला करिस्टिना अब्दुल्ला नावाच्या तरुणाच्या शोधात पाकिस्तानात आली होती. अब्दुल्ला हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबच्या शांगला हिल्सचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, अब्दुल्ला आणि 30 वर्षीय करिस्टिना दुबईमध्ये एकत्र राहत होते. अब्दुल्ला करिस्टीनाला दुबईत (Dubai) सोडून पाकिस्तानात गेला.

पाकिस्तानातील इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात आल्यानंतर महिलेला गुलगस्त कॉलनीतील एका हॉटेलमध्ये रुम घ्यायची होती. परंतु, ते हॉटेल परदेशी लोकांना राहण्यासाठी अधिकृत नसल्याने करिस्टिनाला तिथे राहण्यासाठी जागा मिळू शकली नाही. दरम्यान हॉटेल मॅनेजरने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर करिस्टीनाला मुलतानमधील (Multan) महिला केंद्रामध्ये तिची राहण्याची सोय केली.

दोन दिवसांनंतर महिलेला शहरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पोलिसांनी तिला शहराबाहेर जाण्यास मज्जाव केला. करिस्टिना मेरकुलोवाच्या मैत्रिणीचा फोनही बंद असल्याने दोघांमध्ये बोलणे होऊ शकले नाही.

पोलिसांनी पुढे सांगितले की, महिलेकडे पाकिस्तानच्या इतर भागात जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नव्हती. या सर्व गोष्टींमुळे वैतागलेल्या करिस्टिनाने हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारली. या महिलेला मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तिच्या प्रकृतीत सुधारणा होताच तिला इस्लामाबादमधील रशियन दूतावासात पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT