Russian Fighter Jet Breached Swedish Airspace Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Fighter Jet Breached Swedish Airspace: रशियन बॉम्बर्स स्वीडनमध्ये घुसले… नाटो देश हाय अलर्टवर!

Russian Fighter Jet Breached Swedish Airspace: नाटो आणि रशियामधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. शुक्रवारी दुपारी रशियन बॉम्बर लढाऊ विमानांनी स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला.

Manish Jadhav

Russian Fighter Jet Breached Swedish Airspace: नाटो आणि रशियामधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. शुक्रवारी दुपारी रशियन बॉम्बर लढाऊ विमानांनी स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. रशियन SU-24 बॉम्बरने बाल्टिक समुद्रातील गोटलँड या मोक्याच्या बेटाजवळ स्वीडिश हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. स्वीडिश एअर कॉम्बॅट कमांडने पहिल्यांदा रशियन विमानाला तोंडी इशारा दिला, परंतु विमान आपल्या मार्गावरुन हटले नाही. त्यानंतर दोन स्वीडिश जेएएस-39 ग्रिपेन फायटर प्लेनच्या मदतीने ते स्वीडिश एअरस्पेसमधून हटवण्यात आले.

दरम्यान, स्वीडनच्या हवाई क्षेत्राचे हे उल्लंघन स्वीडन नाटोचा सदस्य झाल्यानंतर केवळ तीन महिन्यांनी झाले आहे, तर 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरचा रशियाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्याचवेळी, रशियाच्या या कारवाईनंतर इतर नाटो देशही हाय अलर्टवर आहेत.

"शुक्रवारी दुपारी रशियन Su-24 जेट फायटरने स्वीडिश हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले," असे स्वीडिश सशस्त्र दलाने सांगितले. स्वीडिश एअर कॉम्बॅट कमांडने रशियन विमानांना तोंडी चेतावणी दिली होती. गॉटलँड रशियामधील कॅलिनिनग्राडपासून 350 किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. स्वीडनच्या लष्करी सिद्धांतानुसार गोटलँडच्या नियंत्रणामुळे ते बाल्टिक समुद्रातील हवाई आणि नौदल गतिविधींना नियंत्रित करु शकतात.

स्वीडनचे हवाई दल प्रमुख जोनास विकमन यांनी सांगितले की, "रशियाची कृती अस्वीकार्य असून आमच्या देशाच्या अखंडतेचा आदर करत नाहीये." 2022 मध्ये मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्वीडनने नाटो लष्करी आघाडीत सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मार्च 2022 मध्ये रशियाने स्वीडिश हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते, जेव्हा स्वीडिश लढाऊ विमानांनी दोन Su-24 आणि दोन Su-27 लढाऊ विमानांना गॉटलँडवर रोखले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT