Ukrain Dainik Gomantak
ग्लोबल

रशिया युक्रेनच्या राजधानी जवळ लष्करी कारवाईला लावणार ब्रेक: रिपोर्ट

रशिया युक्रेनच्या राजधानी कीव (Kyiv) जवळ लष्करी कारवाया सिमित करणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरु आहे. शांततेसाठी वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान, रशियाने (Russia) सांगितले की, 'आम्ही युक्रेनची राजधानी कीव जवळ लष्करी कारवाया मर्यादित करत आहोत.' (Russia will limit military action near the Ukrainian capital Kyiv)

दरम्यान, कीव (Kyiv) आणि चेर्निहाइव्हवर लक्ष केंद्रित करुन युक्रेनमधील आपल्या लष्करी कारवायांना ब्रेक लावल्याचे रशियाने म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनच्या (Ukraine) वार्ताकारांनी सांगितले की, युक्रेनने रशियाशी चर्चेत सुरक्षा हमींच्या बदल्यात तटस्थ भूमिका स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, याचा अर्थ युक्रेन लष्करी आघाडी किंवा यजमान तळामध्ये सामील होणार नाही.

तसेच, रशियाचे उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन म्हणाले, "युक्रेनच्या अण्वस्त्र नसलेल्या स्थितीबद्दलची वाटाघाटी आणि तटस्थतेच्या कराराची तयारी व्यावहारिकतेकडे झुकणारी आहे... कीव आणि चेर्निहाइव्हच्या भागात लष्करी हालचाली हे रशियाचे मूळ आहे. ते अनेक पटींनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य वार्ताकार व्लादिमीर मेडिन्स्की यांनी सांगितले की, 'युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेचा परिणाम फलदायी संवादात झाला असून युक्रेनचे प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांच्यासमोर मांडले जातील.'

ते पुढे म्हणाले की 'पुतिन त्यांचे युक्रेनियन समकक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना भेटू शकतात.'

"आजच्या फलदायी चर्चेनंतर, आम्ही सहमती दर्शवली आहे. आणि विशेष म्हणजे एक तोडगा देखील प्रस्तावित केला आहे, त्यानुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना करारावर स्वाक्षरी करणे तसेच राष्ट्रप्रमुखांची बैठक घेणे शक्य होणार आहे" असेही मेडिन्स्की म्हणाले.

शिवाय, युक्रेनच्या वार्ताकारांनी सांगितले की, ''युक्रेनने रशियासोबतच्या चर्चेत सुरक्षेच्या हमींच्या बदल्यात तटस्थ भूमिका स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, याचा अर्थ युक्रेन लष्करी आघाडीत सामील होणार नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT