Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukriane War : संपूर्ण युक्रेनमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याचा इशारा; कर्णकर्कश आवाजांनी घेरलं युक्रेनला

रशियन सैनिक खुनी आणि बलात्कारी : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

दैनिक गोमन्तक

Russia-Ukriane War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 41 वा दिवस असून अजूनही या देशातील युद्ध थांबलेले नाही. 41व्या दिवसांनंतरही दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतच आहेत. दुसरीकडे, कीवच्या बुचा येथील हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर रशियन सैनिकांवर युद्ध गुन्ह्यांचे आरोप केले जात आहेत. येथे 400 हून अधिक मृतदेह सापडले असून आतापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी रशियन सैनिकांना खुनी आणि बलात्कारी म्हटले आहे. ते आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करणार आहेत. (Russia warned that air strikes across Ukraine)

रशियन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास संपूर्ण युक्रेन जळत आहे. ही आग शांत व्हायच्या आतच आता पुन्हा एकदा हवाई हल्ल्याचा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. खार्किव, कीव, मायकोलायव, पोल्टावा, सुमी, टेर्नोपिल, ओडेसा, डोनेस्तक, ल्विव्ह यासह युक्रेनच्या अनेक प्रांतांमध्ये युद्ध (War) सायरन सतत वाजत आहेत. त्यामुळे कर्णकर्कश आवाजांनी युक्रेनला घेरल्याचेच दिसत आहे.

दरम्यान युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या हत्याकांडावर सर्वत्र टीका होत असून याचा निषेध फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावरही केला जात आहे. तर बूचा किलिंग्स हॅशटॅग अनब्लॉक केला आहे. यापूर्वी हा हॅशटॅग हिंसक कंटेंटमुळे ब्लॉक करण्यात आला होता.

तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ला संबोधित करणार आहेत. युक्रेनमधील नागरिकांच्या हत्येची पूर्णपणे खुली चौकशी करणे कीवच्या हिताचे आहे, असे ते म्हणाले. बुचाला रशियन सैन्याच्या ताब्यातून परत मिळवल्यानंतर तेथे सामूहिक अनेकांचे मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले. तर बोरोडंका आणि इतर शहरांमध्ये जीवितहानी जास्त असू शकते. "मी यावर जोर देऊ इच्छितो की आम्हाला सर्वात पूर्ण, पारदर्शक तपासात रस आहे असे झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा त्यांच्या व्हिडिओ म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT