russia ukraine war russian airstrike mykolaiv killed several people  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War : इमारतीवर हवाई हल्ला, 32 ठार तर 34 जण जखमी

9 मजली इमारतीवरील हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्याने मायकोलायवमधील स्थानिक प्रशासनाच्या इमारतीवर हवाई हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू (Death) झाला तर 34 जण जखमी झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. इमारतीवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर बचाव पथके ढिगार्‍यांमध्ये जिवंत लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

रशियन सैन्याने ज्या इमारतीवर हवाई हल्ला केला ते मायकोलायव शहराच्या गव्हर्नरचे कार्यालय असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याच्या वेळी गव्हर्नर विटाली किम उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी या 9 मजली इमारतीवरील हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

मायकोलायव्ह हे युक्रेनच्या ओडेसा या सर्वात मोठ्या बंदराजवळ वसलेले एक महत्त्वाचे शहर आहे. जे गेल्या काही दिवसांपासून रशियन सैन्याच्या हल्ल्यांना तोंड देत आहे. त्याचवेळी रशियन सैन्याने खार्किवच्या सेंट्रल पार्क ऑफ कल्चर अँड लीझरवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी काही लोक उद्यानात काम करत होते. यामध्ये 57 वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे.

मायकोलायव्ह आणि खार्किव व्यतिरिक्त एनरगोदरमध्येही गोळीबार झाला

युक्रेनमधील (Ukraine) मायकोलायवमध्ये रशियन सैन्याच्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. त्याचवेळी खार्किव शहरात क्षेपणास्त्र (Missiles) हल्ल्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. दुसरीकडे, रशियन सैन्याने एनरगोदर शहरातही जोरदार गोळीबार केला. झापोरिझ्झिया पॉवर प्लांट या शहरात आहे. झापोरिझ्झिया पॉवर प्लांटमध्ये सहा अणुभट्ट्या आहेत.

युक्रेनने 4 मार्च रोजी दावा केला होता की रशियन सैन्याने झापोरिझ्झिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. हा युरोपमधील सर्वात मोठा अणु प्रकल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Goa News Live: नानोडा येथे घराला आग; पाच लाखाहून अधिक रुपयांची हानी

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT