22 Ukrainian Soldiers Released in Latest Prisoner Swap Twitter/ @AndriyYermak
ग्लोबल

Russia-Ukraine War: विनाशकारी युद्धात पुतिन यांची नरमाई! 22 युक्रेनियन सैनिकांची केली सुटका

22 Ukrainian Soldiers Released: गेल्या दीड वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम काय होईल, हे कोणालाच माहीत नाही.

Manish Jadhav

22 Ukrainian Soldiers Released in Latest Prisoner Swap: गेल्या दीड वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम काय होईल, हे कोणालाच माहीत नाही. दोन्ही देश एकमेकांना उद्धवस्त करण्यासाठी जोरदार हल्ले करत आहेत.

या युद्धजन्य वातावरणात कधी-कधी अशा बातम्याही समोर येतात, ज्यामुळे मनाला शांती मिळते. अशीच एक बातमी सोमवारी आली, जेव्हा दोन्ही देशांत युद्धकैदी बनलेल्या सैनिकांची देवाणघेवाण झाली. या बदल्यात रशियाने युक्रेनचे 22 सैनिक सोडले.

हे सैनिक रशियन कैदेतून मुक्त झाले

युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख एंड्री यरमक यांच्या म्हणण्यानुसार, सुटका करण्यात आलेल्या सैनिकांमध्ये (Russia Ukraine War Latest Updates) अधिकारी, सार्जंट आणि सैन्यासोबत आघाडीवर लढणारे विविध सिव्हिलियन यांचा समावेश होता.

टेलिग्राम व्हिडिओनुसार, रिलीझ झाल्यानंतर, काही युक्रेनियन सैनिक निळे आणि पिवळे युक्रेनियन ध्वज परिधान केलेल्या फोटोसाठी पोज देताना आणि "युक्रेनचा (Ukraine) विजय" असा जयघोष करताना दिसले.

गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहे

अरबी न्यूज वेबसाइट अल जझीरानुसार, यरमक म्हणाले की, 'आज आम्हाला 22 युक्रेनियन सैनिक (Russia Ukraine War Latest Updates) रशियाच्या बंदिवासातून परत मिळाले. सुटका करण्यात आलेल्या POWs पैकी सर्वात जास्त वय असलेला सैनिक 54 तर सर्वात लहान वय असलेला सैनिक 23 वर्षांचा आहे.

रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत दोन्ही बाजूचे हजारो लोक मारले गेले आहेत. त्याचवेळी, युक्रेनने रशियन सैन्यावर आपल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात हत्या केल्याचा आणि पकडलेल्या युक्रेनियन सैनिकांचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

युक्रेनने युद्ध संपवण्याचा फॉर्म्युला दिला

तत्पूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, कीवने युद्ध (Russia Ukraine War Latest Updates) संपवण्यासाठी शांतता फॉर्म्युला प्रस्तावित केला आहे. जेद्दाहमध्ये शांतता चर्चेसाठी एकूण 42 देश एकत्र आले आहेत, असे झेलेन्स्की यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ मेसेज दिला. प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करायची असते.

जेद्दाहमध्ये 42 देश एकत्र आले आहेत

झेलेन्स्की पुढे म्हणाले की, 'आजचा दिवस आमच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांसाठी खास आहे. आमची टीम जेद्दाह, सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) शांतता फॉर्म्युल्यावर काम करत आहे. एकूण 42 देशांचे शिष्टमंडळ तिथे काम करत आहेत. हे देश वेगवेगळ्या खंडातील असून सर्वांचा राजकीय दृष्टिकोन वेगळा आहे. असे असूनही, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्राधान्याने सर्वजण एकत्र आहेत.'

'सर्व देशांनी एकजुटीने बोलणे गरजेचे'

ते पुढे असेही म्हणाले की, 'युक्रेनने शांतता फॉर्म्युला प्रस्तावित केला आहे, जेणेकरुन रशियन आक्रमणापूर्वी आंतरराष्ट्रीय नियम-आधारित ऑर्डर पुनर्संचयित करता येईल (Russia Ukraine War Latest Updates). जेद्दाह बैठकीत सहभागी सर्व देशांशी आमची चर्चा सुरु आहे. यासोबतच आमची द्विपक्षीय चर्चाही सुरु आहे. हे काम केल्याबद्दल आमच्या शिष्टमंडळाचे आभार. या विषयावर सर्व जगाने एकजुटीने बोलणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT