Russia-Ukraine War: 'मी खरं बोललो अन् पद गमावले' रशियाच्या जनरलचा गौप्यस्फोट

Russia-Ukrain War: 58व्या संयुक्त सशस्त्र सेनेचे रशियाकडून नेतृत्व करत होते.
russia ukraine war impact
russia ukraine war impactDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Ukrain War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या दीड वर्षापासून सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांच्या युद्धावर आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेने रशियाला वारंवार हे युद्ध थांबवण्याचा इशारादेखील दिला आहे. या युद्धात युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले असले तरीही युक्रेन निकाराने लढा देत आहे.

आता रशियन सैन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियन सैन्यातील एका सैन्यअधिकाऱ्याने सत्य परिस्थिती आपल्या सैनिकांना सांगितल्यावर या जनरलला आपल्या नोकरीला मुकावे लागल्याची माहीती समोर आली आहे.

मेजर जनरल इवान पोपोव असे या सैन्य अधिकाऱ्याचे नाव असून यूक्रेनच्या दक्षिणी ज़ापोरिज़िया क्षेत्रात 58व्या संयुक्त सशस्त्र सेनेचे रशियाकडून नेतृत्व करत होते. जनरल पोपोव ज्या तुकडीचे नेतृत्व करत होते ती रशिया-युक्रेन युद्धात सैन्यात सर्वात पुढे होती. त्यांनी आपल्या सैनिकांसाठी एक ऑडीओ क्लिपद्वारे एक संदेश दिला होता.

एनबीसी न्यूजनुसार, या ऑडीओ क्लिपमधील संदेश हा सैन्यासाठीच होता. मात्र रशियातील राजकीय नेते आणि रशियाच्या दक्षिणी सैन्य कमानचे पूर्व डेप्ट्युटी कमांडर आंद्रे गुरुलेव यांनी ही ऑडीओ क्लिप टेलिग्रामवर शेअर केली होती.

ज्यामध्ये मी सत्य परिस्थिती सैनिकासमोर ठेवल्याने मला पदावरुन हटवले गेले, असे जनरल पोपोव यांनी म्हटल्याचे प्रतित होत आहे. दरम्यान, रशियातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे सदस्य असलेल्या आंद्रे गुरुलेव यांनी त्यांना ही क्लिप कशी मिळाली याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी सैन्याला धोका दिला असून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे जनरल पोपव यांनी म्हटले आहे. जनरल पोपव यांनी युक्रेनी तोपखान्यामुळे रशियन सैनिकांचा झालेल्या मृत्यूंचा मुद्दा उचलला होता.

रशियन सैन्यामध्ये योग्य काउंटर आर्टिलरी सिस्टिम आणि शत्रूकडे किती तोपखाने आहेत याचा शोध घेण्यात हे अधिकारी अपयशी ठरल्याने रशियन सैनिक मृत्यूमुखी पडल्याचे जनरल पोपोव यांनी म्हटले आहे.

russia ukraine war impact
Attack On Hindu Temple: पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला

दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धाला आगामी काळात नेमकी कोणती दिशा मिळणार याची चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या हे युद्ध थांबणार की पुढे तसेच सुरु राहणार याचा अंदाज कठीण असल्याचे तज्ञाकडून म्हटले जात आहे.

दरम्यान, वॅगनर ग्रुपने पुतीन यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. वॅगनर ग्रुपने युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यास नकार दिला आहे. यानंतर रशियामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com