रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम कळत - न कळत जगातील बहूतांशी राष्ट्रांना भोगावे लागत आहेत. जगभर वाढत चाललेले इंधनाचे दर, आणि इतर वस्तु यांच्या दरवाढीबद्दल थेट रशिया युक्रेन युद्धाकडे बोट दाखवले जात आहे.हे युद्ध सुरू होऊन आज 109 दिवस उलटले आहेत, तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. (Russia - Ukraine war kills 10,000 Ukrainian soldiers )
युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं युद्धात मृत पावलेल्या सैनिकांबाबत मोठा खुलासा केला आहे.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी शनिवारी सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनच्या 10 हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक मुलाखत दिली होती. मुलाखती दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी 10 सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. याशिवाय युद्धात दररोज १०० युक्रेनियन सैनिक मारले जात असल्याची माहिती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी अलीकडेच दिली होती.
दुसरीकडे, रशियानं मात्र युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या जीवितहानीबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नाही. रशियानं 25 मार्च 2022 रोजी युक्रेनसोबतच्या युद्धात आमचे 1351 सैनिक मारले गेल्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर त्यांनी जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत भाष्य केलं नाही. पण अमेरिका आणि इतर काही पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने युद्धात आपले १० हजार सैनिक गमावले आहेत.
त्यामूळे मान्य केले नाही केले तरी दोन्ही राष्ट्रांची मोठी जीवीत आणि वितहाणी झाली आहे. यातून बोध घेत दोन्ही राष्ट्रांनी सामोपचाराची भुमिका घेणे अपेक्षित आहे. मात्र सद्या तरी दोन्ही राष्ट्रे माघार घेण्याच्या पवित्र्यात नसल्याने या दोन्ही राष्ट्रांचे भविष्य काय याकडे संपुर्ण जगाच लक्ष लागुन राहीले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.