गन कल्चरविरोधात अमेरिकेत 450 शहरांमध्ये लोक रस्त्यावर

230 वर्षांनंतरही अमेरिकेत बंदूक संस्कृती संपली नाही
Usa Gun Culture
Usa Gun CultureDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील एकूण लायसन्स असलेल्या बंदुकींची संख्या ही 39 कोटी (2018) इतकी आहे. तर अमेरिकेची लोकसंख्या ही 33 कोटी (2018) इतकी आहे. गन व्हॉयलन्समुळे अमेरिकेचे झालेले आर्थिक नुकसान- 280 अब्ज डॉलर्स (22 लाख कोटी) वार्षिक आहे. यामूळे अमेरिकेत सद्या संरक्षण दलातील जीवीत हाणीपेक्षा अंतर्गत हल्ल्यांमध्ये मोठी हाणी होत असल्याचं चित्र आहे. त्यामूळे हे चित्र बदलले जावे यासाठी गन कल्चरविरोधात अमेरिकेतील 450 शहरांमध्ये लोक रस्त्यावर आहेत. (Protests against gun culture in 450 cities across the United States )

24 मे रोजी टेक्सास येथील शाळेत गोळीबार झाला होता. यात 19 मुले आणि दोन शिक्षक ठार झाले होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. यापूर्वी ही अनेक अशा घटनांनमूळे अमेरिकेच्या जनतेत संताप पसरला असून याचा परिणाम म्हणून अमेरीकेतील वॉशिंग्टनसह 450 शहरांमध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली आहेत.

Usa Gun Culture
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

230 वर्षांनंतरही अमेरिकेत बंदूक संस्कृती संपवलेली नाही. याची दोन कारणे आहेत. पहिला- अनेक अमेरिकन राष्ट्रपतींपासून तिथल्या राज्यांच्या राज्यपालांपर्यंत ही संस्कृती जपण्याचा सल्ला देत आहेत. दुसरी- बंदूक बनवणाऱ्या कंपन्या, म्हणजेच गन लॉबी हे देखील ही संस्कृती टिकून राहण्याचे प्रमुख कारण आहे. 2019 च्या अहवालानुसार, यूएसमध्ये 63 हजार परवानाधारक बंदूक डीलर्स होते, ज्यांनी त्या वर्षी अमेरिकन नागरिकांना 83 हजार कोटी रुपयांच्या बंदुकांची विक्री केली.

अमेरिकेतील 1791 मध्ये राज्यघटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीनुसार, अमेरिकन नागरिकांना शस्त्रे ठेवण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. ही संस्कृती अमेरिकेत ब्रिटिशांची सत्ता असताना सुरू झाली. त्या काळी कायमस्वरूपी सुरक्षा दल नव्हते, म्हणूनच लोकांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रे ठेवण्याचा अधिकार दिला होता, पण अमेरिकेचा हा कायदा आजही कायम आहे.

Usa Gun Culture
तब्बल 300 वर्षांपूर्वी बुडालेल्या 2 जहाजांचा लागला शोध

अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार

अमेरिका देशातील वाढता गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे. असे असताना हा प्रश्न मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा हे देखील यावर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. याच प्रश्नावरुनच अमेरिका प्रशासन आज ही हतबल असल्याचे दिसत आहे. असे असताना अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत.

याबाबत बायडन म्हणाले की, जास्त संहारक बंदुकी देण्यावर बंदी घालण्यात यावी, बंदुका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात याव्यात, तसेच एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाच तर बंदूक उत्पादकांनादेखील जबाबदार धरले जावे यासाठी आता प्रशासन प्रयत्नशिल असणार आहे. तसेच सामूहिक गोळीबार रोखण्यासाठी नियम कठोर करण्यात यावेत असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com