Russia Ukraine War
Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: इस्राइल-हमास युद्धाला विराम तर रशिया-युक्रेन युद्धाने डोके काढले वर

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: इस्राइल-हमास युद्ध सध्या थांबले असताना आता पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धाने डोके वर काढले आहे. रशियाने सुमारे 75 इराणी-निर्मित ड्रोनने हल्ला केल्याची माहीती समोर आली आहे.

रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याच्या सुरुवातीपासूनचा सर्वात भीषण ड्रोन हल्ला आता करण्यात आल्याचे समोर आले आहे. युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.

युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी टेलिग्राम चॅनलवरील पोस्टमध्ये लिहिले की, 'या हल्ल्यात राजधानी कीवला प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले.' युक्रेनच्या सशस्त्र दलांनी रशियाने सुमारे 75 इराण-निर्मित ड्रोनने हल्ला केला, त्यापैकी 74 पाडण्यात आल्याची माहीती दिली आहे.

हवाई संरक्षण यंत्रणांनी राजधानी आणि आसपासच्या भागात सकाळी 66 हवाई हल्ले परतवल्याचे युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनात यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की, कीवमधील 17,000 लोकांचा वीजपुरवठा या हल्ल्यामुळे खंडित झाला होता, मात्र हल्ल्यानंतर काही वेळानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, शहरात अनेक तास चाललेल्या ड्रोन हल्ल्यात किमान पाच नागरिक जखमी झाले आणि अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. जखमींमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

कीव व्यतिरिक्त, सुमी, निप्रॉपेट्रोव्स्क, झापोरिझिया, मायकोलायव्ह आणि किरोव्होहराड प्रदेशांना देखील लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, दक्षिण खेरसन भागात गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. प्रादेशिक गव्हर्नर अलेक्झांडर प्रोकुडिन यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत या भागात 100 वेळा गोळीबार झाला.

जगभरात सध्या या दोन्ही युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महागाईमध्येदेखील वाढ झाली आहे. युद्ध थांबून कधी सामान्य जीवनाला सुरुवात होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT