russia ukraine war  Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनमधील महिला भीतीच्या छायेत, पुरुषांसारखा करावा लागतोय 'हेअर कट'

रशियन सैन्याच्या अत्याचारपासून बचाव करण्यासाठी येथील महिला आपले केस कापत आहेत.

दैनिक गोमन्तक

रशियाच्या आक्रमणानंतर आता युक्रेनमधील महिला स्वत: च्या जीव वाचवण्यासाठी लढत आहेत. इव्हांकिव शहरातील महिलांवरील बलात्कार टाळण्यासाठी केस कापण्याची सक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. पण येथे महिलांवर बलात्कार झाल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका महिलेने दावा केला होता की रशियन सैनिकांनी तिच्यावर बलात्कार केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमहापौर मरिना बेशास्ताना यांनी सांगितले की, रशियन सैन्याकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून बचाव होण्यासाठी महिला केस कापत आहेत. यामुळे त्यांचे सौंदर्य कमी होईल असे त्यांचे मत आहे. 30 मार्च रोजी युक्रेन रशियन सैन्याच्या नियंत्रणातून मुक्त झाले. मरिना म्हणाल्या युद्धा दरम्यान महिला (women) केसांनी पकडून ओढून नेत त्यांच्यावर अत्याचार केले गेले आहेत. त्या म्हणाला महिला कमी आकर्षक दिसण्यासाठी केस कापत आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे कोणात्याही पुरूषांचे लक्ष जावू नये' यादरम्यान त्यांनी जवळच्या गावात 15 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींवर बलात्कार झाल्याची घटनाही सांगितली.

अलीकडेच एका युक्रेनियन महिलेने दावा केला की, रशियन सैनिकांनी तिच्या पतीची हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याचा दावा युक्रेनच्या खासदार लेसिया वेसिलेंक यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT