Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Russia Poseidon Nuclear Drone: रशियाने एकाच आठवड्यात दुसऱ्या महाविनाशक शस्त्राची यशस्वी चाचणी करुन संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

Russia Poseidon Nuclear Drone: रशियाने एकाच आठवड्यात दुसऱ्या महाविनाशक शस्त्राची यशस्वी चाचणी करुन संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली. 'बुरेवेस्टनिक आयसीबीएम क्रूझ अणु क्षेपणास्त्र'च्या यशानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 'पोसायडॉन' (Poseidon) नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या सागरी ड्रोनच्या यशस्वी चाचणीचा दावा केला. रशियाच्या मते, 'पोसायडॉन' अणु-ड्रोन रशियाच्याच 'सरमत' (Sarmat) क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आणि धोकादायक आहे. पुतिन यांनी दावा केला की, या शस्त्राचा सामना करण्याची क्षमता सध्या जगात कोणत्याही देशाकडे नाही.

'पोसायडॉन'चा मुकाबला कोणीच करु शकत नाही

RT.Com नुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी ऐतिहासिक घोषणा करत सांगितले की, रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' पाणबुडी ड्रोनचा यशस्वी प्रयोग केला. या 'डूम्सडे टॉर्पेडो'ची क्षमता रशियाच्या 'सरमत' इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रालाही 'बऱ्याच अंशी मागे टाकते'. सरमत क्षेपणास्त्र जगातील सर्वात विनाशकारी शस्त्रांपैकी एक मानले जाते. पुतिन यांनी सांगितले की, हा ड्रोन गती आणि पाण्यात खोलवर जाण्याच्या (Depth) क्षमतेत अद्वितीय आहे, ज्याचा मुकाबला सध्या जगात कोणीच करु शकत नाही.

हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट अधिक स्फोटक क्षमता

रशियाने 28 ऑक्टोबर रोजी हा यशस्वी प्रयोग केला, ज्यात ड्रोनच्या अणुभट्टीला सक्रिय करण्यात आले. पुतिन यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले की, 'पोसायडॉन'चा अणुऊर्जा प्रकल्प 'बुरेवेस्टनिक' क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षा 1000 पट अधिक शक्तिशाली आहे. हा ड्रोन 100 मेगाटन क्षमतेचा अणु वॉरहेड घेऊन जाऊ शकतो, जो हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 6600 पट जास्त स्फोटक आहे. पुतिन यांच्या मते, या शस्त्राला जगात कोणीही याला रोखू शकत नाही.

'पोसायडॉन' निर्माण करेल 'रेडिओधर्मी त्सुनामी

दरम्यान, या धोकादायक शस्त्राचा मुख्य उद्देश किनारपट्टीच्या शहरांमध्ये रेडिओधर्मी त्सुनामी निर्माण करणे आहे, ज्यामुळे ते परिसर अनेक वर्षे राहण्यायोग्य राहणार नाहीत. 'पोसायडॉन'ला नाटो (NATO) देशांकडून 'स्टेटस-6' म्हटले जाते. हे 2018 मध्ये पुतिन यांनी घोषित केलेल्या सहा 'सुपर शस्त्रांपैकी' एक आहे. ही एक स्वायत्त पाणबुडी आहे, जी 'बेलगोरोड' पाणबुडीतून प्रक्षेपित केली जाते. याची रेंज 10000 किमी पेक्षा जास्त आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने आपल्या लष्करी श्रेष्ठतेचे प्रदर्शन करण्यासाठी ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बायणा अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

SCROLL FOR NEXT