Russia Nuclear Satellite Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Nuclear Satellite: अवकाशात अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवण्याच्या तयारीत रशिया? जर्मनीच्या गुप्तचर रिपोर्टने खळबळ; नाटो देशांची वाढली धाकधूक

Russia Nuclear Armed Satellite News: रशिया-युक्रेन संघर्षाचे सावट आता थेट अवकाशापर्यंत पोहोचण्याची गंभीर शक्यता व्यक्त केली जात आहे.

Manish Jadhav

Russia Nuclear Armed Satellite News: रशिया-युक्रेन संघर्षाचे सावट आता थेट अवकाशापर्यंत पोहोचण्याची गंभीर शक्यता व्यक्त केली जात आहे. जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणांच्या विश्लेषणानुसार, रशिया डिसेंबरपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवू शकतो. असे झाल्यास अवकाशात अण्वस्त्रे तैनात करण्यास मनाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांचा भंग होईल आणि जागतिक उपग्रह जाळ्यावर चालणाऱ्या दळणवळण, इंटरनेट व इतर अत्यावश्यक सेवांवर मोठे संकट कोसळू शकते.

जर्मनीची परदेशी गुप्तचर संस्था बीएनडी आणि लष्कराला यासंदर्भात माहिती मिळाली असून, रशियाने अनेक वर्षांपूर्वी ‘स्पुतनिक-एस’ नावाचा उपग्रह तयार करुन मॉस्कोमध्ये ठेवला असल्याचा दावा अहवालात करण्यात आला.

नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आकलनानुसार, हा उपग्रह साठ दिवसांच्या आत अवकाशात सोडला जाऊ शकतो आणि प्रक्षेपणानंतर लवकरच तो कार्यान्वित होऊ शकतो, मात्र रशियाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अनेक नाटो देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी या उपग्रहाबाबत माहिती शेअर केल्याचे सांगत जर्मन लष्कराच्या स्पेस कमांडने डिसेंबरमध्ये प्रक्षेपणाची शक्यता वर्तवली.

या उपग्रहाद्वारे अवकाशात अण्वस्त्राचा स्फोट झाल्यास पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील उपग्रहांना फटका बसून नेव्हिगेशन, दूरसंचार आणि हवामानविषयक सेवा ठप्प होऊ शकतात. या सेवांचा वापर सर्वसामान्य नागरिक, सरकारे आणि लष्कराकडून केला जातो; तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा खंडित झाल्यास त्यास सामोरे जाण्याची जर्मनीची (Germany) तयारी अपुरी असल्याचेही अहवालात नमूद केले.

दुसरीकडे, रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावत तो केवळ प्रचार असल्याचा दावा केला. अशा अहवालांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले असून, रशियाचा अवकाश कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचे जर्मनीतील रशियन दूतावासाने स्पष्ट केले. मात्र, रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेन व नाटोच्या कारवायांमुळे अनेकदा अण्वस्त्रांच्या वापराचा विचार करावा लागल्याचे सूचित केले.

दरम्यान, नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी बर्लिनमध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत अवकाशासह प्रत्येक भागाच्या सुरक्षेची ग्वाही दिली. 1967च्या आउटर स्पेस ट्रीटी आणि 1963च्या आंशिक अणुचाचणी बंदी करारामुळे अवकाशात अण्वस्त्रे तैनात करणे व चाचण्या करणे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Institute Menezes Braganza: 150 वर्षांची सांस्कृतिक परंपरा! गोव्याच्या साहित्य-कला विश्वाचा आधार 'मिनेझीस ब्रागांझा'

Shirgaon Mining Impact: खाणकामातून हजारो कोटींची कमाई, पण गावाचे पाणी, शेती अन् रोजगार संकटात

VIDEO: प्रियांश आर्यचा 'रुद्रावतार'! 266 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई; 19 षटकार आणि 7 चौकारांसह कुटल्या 181 धावा

Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

Bangladesh Violence: बांगलादेशात राजकीय संघर्ष शिगेला! शेख हसीना यांच्या समर्थकांच्या रॅलीवर हल्ला; गोपालगंजमध्ये जाळपोळ आणि तोडफोड VIDEO

SCROLL FOR NEXT