Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर भीषण ड्रोन हल्ला; 13 जणांचा मृत्यू तर 10 जखमी, झेलेंस्कींनी व्यक्त केला संताप!

Russia Drone Attack Dnipro Railway Station Ukraine: युक्रेनच्या निप्रो रेल्वे स्टेशनवर रशियाने गुरुवारी (29 ऑक्टोबर) सकाळी केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात एका उभ्या असलेल्या प्रवासी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला लक्ष्य केले.
Russia Drone Attack Dnipro Railway Station Ukraine
Russia Drone Attack Dnipro Railway Station UkraineDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Russia Drone Attack Dnipro Railway Station Ukraine: युक्रेनच्या निप्रो रेल्वे स्टेशनवर रशियाने गुरुवारी (29 ऑक्टोबर) सकाळी केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात एका उभ्या असलेल्या प्रवासी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला लक्ष्य केले. या दुर्देवी घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींवर प्राथमिक उपचार सुरु केले.

युक्रेनियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, झापोरिजियासाठी निघण्याच्या तयारीत असलेल्या प्रवासी ट्रेनवर रशियाच्या एका जेट-पावर्ड ड्रोनने थेट हल्ला चढवला. हवाई हल्ल्याचा इशारा आणि धोका वाढल्याची घोषणा करण्यात आली असतानाही अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरच उपस्थित होते. निप्रॉपेट्रोव्हस्क ओब्लास्टचे गव्हर्नर ओलेक्सांद्र हंझा यांनी स्पष्ट केले की, आपत्कालीन यंत्रणा आणि वैद्यकीय पथके तातडीने मदतकार्यात गुंतली आहेत. रशियाकडून युक्रेनच्या रेल्वे पायाभूत सुविधांवर आणि प्रवासी ट्रेनवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांची ही आणखी एक गंभीर घटना मानली जात आहे.

Russia Drone Attack Dnipro Railway Station Ukraine
India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या रशियन हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करत सर्व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असल्याचे सांगितले. झेलेंस्की म्हणाले की, रशियाने तणाव कमी करण्याऐवजी पुन्हा एकदा युक्रेनियन नागरिकांवर दहशतवादी हल्ला केला. रशियाची (Russia) वाढती आक्रमकता पाहता अमेरिका, युरोपीय युनियन आणि G7 देशांनी रशियावरील निर्बंध शिथिल न करता त्यांच्या वॉर मशीनविरुद्ध आणखी कडक आणि निर्णायक पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com