Russia Helicopter Crash: भीषण दुर्घटना! रशियाचं KA-226 हेलिकॉप्टर क्रॅश, 5 जणांचा मृत्यू Watch Video

Russia Helicopter Crash Video: ७ नोव्हेंबर रोजी रशियाच्या दागेस्तान राज्यात घडलेल्या भीषण अपघातात रशियन KA-२२६ या हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला.
Russia Helicopter Crash Video
Russia Helicopter Crash VideoDainik Gomantak
Published on
Updated on

७ नोव्हेंबर रोजी रशियाच्या दागेस्तान राज्यात घडलेल्या भीषण अपघातात रशियन KA-२२६ या हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात हेलिकॉप्टर खडकावर आदळून अक्षरशः फुटबॉलसारखे उडताना आणि नंतर समुद्रात कोसळताना दिसते.

ही घटना कॅस्पियन समुद्राच्या प्रदेशातील अची-सु गावाजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरने अचानक नियंत्रण गमावले आणि काही क्षणातच ते जमिनीवर आपटले. या हेलिकॉप्टरमध्ये कुमर्टाऊ इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्लांट (KEMZ) चे चार कर्मचारी होते. या कंपनीने ८ नोव्हेंबर रोजी या दुःखद घटनेची पुष्टी केली. मृतांमध्ये कंपनीचे उपमहासंचालक आणि हेलिकॉप्टरचे फ्लाइट मेकॅनिक यांचा समावेश आहे.

Russia Helicopter Crash Video
Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

अपघातानंतर रशियन आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन जण गंभीर जखमी अवस्थेत सापडले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा पायलटचा ताबा सुटणे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रशियन राज्य माध्यमांनी ही उड्डाण सेवा पर्यटकांसाठी असल्याचे सांगितले होते. परंतु नंतर हे स्पष्ट झाले की हे उड्डाण KEMZ कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी होते. ही कंपनी संरक्षण उपकरणे तयार करते आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पुरवठा केल्याबद्दल अमेरिकेने तिच्यावर निर्बंध घातले आहेत.

Russia Helicopter Crash Video
Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

KA-२२६ हे दोन इंजिन असलेले हलके हेलिकॉप्टर असून, ते सात प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे. हे हेलिकॉप्टर मुख्यतः उंच आणि कठीण भौगोलिक प्रदेशात, बचावकार्ये आणि सैनिकी मोहिमांसाठी वापरले जाते. दागेस्तानमधील या अपघातानंतर रशियन विमान वाहतूक विभागाने चौकशी सुरू केली असून, दुर्घटनेचे अचूक कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स तपासला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com