Spacepart Biconor Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: रशियाने रॉकेटवरुन हटवला अमेरिका अन् जपानचा ध्वज, भारतीय तिरंगा कायम

रशियन सरकारच्या स्पेस एजन्सीने स्पेसपार्ट बायकोनूरमधील मोठ्या रॉकेटवर रंगवलेले अमेरिका, यूके आणि जपानसह (Japan) अनेक देशांचे ध्वज हटवले आहेत.

दैनिक गोमन्तक

रशियन सरकारच्या स्पेस एजन्सीने स्पेसपार्ट बायकोनूरमधील मोठ्या रॉकेटवर रंगवलेले अमेरिका, यूके आणि जपानसह अनेक देशांचे ध्वज हटवले आहेत. यामध्ये मात्र भारताचा ध्वज कायम ठेवण्यात आला आहे. स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसची ही प्रतिकात्मक कारवाई या देशांशी बिघडलेले संबंध दर्शवते. युक्रेनच्या नाटो (North Atlantic Treaty Organization) मध्ये सामील होण्याच्या प्रयत्नांवर रशियाने (Russia) आपत्ती व्यक्त केल्यानंतर सुमारे एका आठवड्यानंतर हे पाऊल उचलले आहे. (Russia Has Removed The US Japanese Flag Painted On Rockets)

विशेष म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्याची घोषणा केल्यानंतर, रशियन सैन्याने कीवसह युक्रेनच्या प्रमुख शहरांवर जोरदार हल्ला चढवला होता. नाटोचे सदस्य देश फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन आणि अमेरिकेसह जपानसारख्या देशांनी रशियाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ रशियावर कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. रोसकॉसमॉसचे महासंचालक दिमित्री ओलेगोविच रोगोझिन यांनी ट्विट करत म्हटले की, "बायकोनूर लाँचर्सनी ठरवले आहे की, आमचे रॉकेट काही देशांच्या ध्वजांशिवाय अधिक सुंदर दिसेल."

दरम्यान, ट्विटमध्ये एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये स्पेसपोर्टवरील रशियन कर्मचारी इतर देशांचे झेंडे हटवताना दिसत आहेत. मात्र, भारताचा ध्वज कायम ठेवण्यात आला आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ठरावावरील मतदानात भारताने बुधवारी भाग घेतला नाही. परिषदेत आणलेल्या तिसऱ्या ठरावात भारताने भाग घेतला नाही.

तसेच, ठरावावर मतदान केल्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, भारत युक्रेनमधील झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीबद्दल आणि मानवतावादी संकटाबद्दल आम्ही चिंतित आहोत. प्रादेशिक अखंडतेसाठीच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी आणि रशियाच्या "तीव्र निषेध" करण्यासाठी मतदान केले. यामध्ये प्रस्तावाच्या बाजूने 141 मते पडली, तर 35 सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. तसेच पाच सदस्यांनी विरोधात मतदान केले. ठराव मंजूर होताच महासभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. महासभेत ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. रशियाच्या आण्विक हल्ल्यासंबंधीच्या निर्णयाचाही या ठरावात निषेध करण्यात आला आहे. राजकीय संवाद, मध्यस्थी आणि इतर शांततापूर्ण मार्गांद्वारे रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचे त्वरित शांततापूर्ण निराकरण करण्याची मागणी या ठरावात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT