Russia-Ukraine war : पॅरिसमधील संग्रहालयाने पुतिन यांचा मेणाचा पुतळा हटवला

Russia-Ukraine war : 'आम्ही ग्रेविन संग्रहालयात हिटलरसारख्या हुकूमशहाचे प्रतिनिधित्व केले नाही'
vladimir putin
vladimir putindainikgomantak
Published on
Updated on

Russia Vladimir Putin Hitler Grevin Museum Wax statue

Russia-Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता अजूनही नाही. आज आठ दिवस झाले असून युक्रेनमध्ये रशियन सैनिक आणि युक्रेन सैनिकांमध्ये धुमशचक्री उडालेली आहे. या युद्धाच्या निषेधार्थ अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तर अनेक देशांनी त्यांची हवाई हद्द रशियासाठी बंद केली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्युदो फेडरेशनने पुतिन यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी देखील केली होती. तर फिफा विश्वचषकातूनही रशियाची हकालपट्टी करण्यात आली आहे. यादरम्यान पुतिन यांना आणखी एक धक्का बसला आहे. (Wax statue of Vladimir Putin removed from Paris museum

आज गुरुवारी ३ मार्च रोजी पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयातून रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला. यावर ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले, “आम्ही ग्रेविन संग्रहालयात (Grevin Museum) हिटलरसारख्या (Hitler) हुकूमशहाचे प्रतिनिधित्व कधी केले नाही. त्यामुळे आता आम्ही पुतिनचे यांचेही प्रतिनिधित्व करू इच्छित नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com