Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनमधील 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट!

नष्ट झालेल्या सुविधांमध्ये 11 एअरफील्ड, तीन कमांड पोस्ट आणि S-300 ची 18 रडार स्टेशन आणि Buk-M1 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाने सांगितले की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील 11 एअरफील्डसह 70 हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन सशस्त्र दलांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या 74 लष्करी ग्राउंड सुविधा नष्ट झाल्या. यासोबतच रशियाने युक्रेनचे (Ukraine) एक लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडले आहेत. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, नष्ट झालेल्या सुविधांमध्ये 11 एअरफील्ड, तीन कमांड पोस्ट आणि S-300 ची 18 रडार स्टेशन आणि Buk-M1 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, फुटीरतावादी शक्तींना रशियन सैन्याचा पाठिंबा आहे आणि आक्रमण सुरू आहे.(Russia Destroy More Than 70 Military Base In Ukraine)

युक्रेनियन सैनिकांशी आदराने वागण्याचा आदेश

संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी रशियन (Russia) सैनिकांना युक्रेनियन सैनिकांशी आदराने वागण्याचे आदेश दिले होते. स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.40 वाजता राष्ट्राला संबोधित करतांना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला.

किमान 68 लोकांचा मृत्यू

एएफपी वृत्तसंस्थेने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत म्हटले आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांसह किमान 68 लोक मारले गेले. युक्रेनच्या ब्लॅक सी बंदर शहर ओडेसाजवळील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 18 जण ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या सीमा रक्षकांनी सांगितले की, रशियन सैन्य राजधानी कीवच्या आसपासच्या भागात पोहोचले आहे.

युक्रेनला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्यापासून रोखण्याचा आणि मॉस्कोला सुरक्षा हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पुतीन यांनी अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांवर केला आहे. पुतीन म्हणाले की, रशियाचे उद्दिष्ट युक्रेनला ताब्यात घेणे हा नाही, तर या प्रदेशाला लष्करी प्रभावापासून मुक्त करणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देणे हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Partgali Math Goa: PM मोदींच्या आगमनाची तयारी! पर्तगाळी मठाचा 550 वा वर्धापनदिन, CM सावंतांनी घेतला तयारीचा आढावा

Srinagar Blast: श्रीनगरमध्ये स्फोटाबाबत मोठा खुलासा! 9 ठार, 32 हून अधिक जखमी; दहशतवाद्यांच्या मॉड्यूलशी थेट संबंध

Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

Goa Live News: वृक्षमाता 'पद्मश्री थिमक्का' यांचे वयाच्या '114'व्या वर्षी निधन

Sunil Gudlar Case: सुनील गुडलरला कोर्टाचा दणका! CCTV फुटेज देण्याची मागणी फेटाळली; आरोपपत्र दाखल होईपर्यंत वाट पहावी लागणार

SCROLL FOR NEXT