Flight  Dainik Gomantak
ग्लोबल

... म्हणून पाकिस्तानच्या विमानाला रशियाने 'ओव्हरफ्लाईंग क्लिअरन्स' नाकारला

टोरंटोला जाणाऱ्या विमानाला इराण, तुर्की आणि युरोपचा मार्ग वापरावा लागेल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.

Akash Umesh Khandke

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा अपमान सहन करावा लागला आहे. खरेतर, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने थकबाकी न भरल्यामुळे रशियाने फ्लाइटला ओव्हरफ्लाईंग क्लिअरन्स देण्यास नकार दिला. यानंतर इस्लामाबादहून टोरंटोला जाणाऱ्या विमानाला मार्ग बदलावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाब 17 जूनची आहे. इस्लामाबादहून टोरंटोला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाला ओव्हरफ्लायिंग क्लिअरन्स मिळालेला नाही. यानंतर हे विमान प्रथम कराचीत आणण्यात आले. येथून फ्लाइटने युरोपीय देशांची हवाई हद्द वापरली आणि उड्डाण टोरंटोला पोहोचले. PIA फ्लाइट PK781 मध्ये 250 पेक्षा जास्त प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) ला ओव्हरफ्लायंग क्लिअरन्सच्या शुल्कासाठी पैसे हस्तांतरित करण्यात अडचणी येत होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे म्हणणे आहे की जागतिक निर्बंधांमुळे रशियाला पेमेंट मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत पीआयएला पर्यायी मार्ग काढावा लागला.

टोरंटोला जाणाऱ्या विमानाला इराण, तुर्की आणि युरोपचा मार्ग वापरावा लागेल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. कराचीहून विमानाने उड्डाण केले. त्याचवेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्विट केले आणि लिहिले की, पीआयएचे इस्लामाबाद ते टोरंटोचे फ्लाइट उशीरा आहे, खरे तर रशियाने पीआयएला थकबाकी भरण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पाकिस्तान सरकारला या "लज्जास्पद परिस्थिती"चे कारण काय आहे असा प्रश्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT