Sri Lanka Fual Crisis: श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) म्हणाले की, 'अन्न, इंधन आणि विजेच्या कमतरतेनंतर त्यांची कर्जबाजारी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. वीज आणि अन्न पुरवठ्याच्या अभावामुळे आणखी भीषण परिस्थितीचा सामना देशातील जनता करत आहे. देशाती अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली मला दिसत आहे. ती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.'
विक्रमसिंघे हे कचे अर्थमंत्री देखील आहेत ज्यांच्यावर अर्थव्यवस्था स्थिर करण्याची जबाबदारी आहे. 'लंकेचे पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर मोठे कर्ज असल्याने आयात केलेले तेल खरेदी करणे अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी ( आयएमएफ ) चर्चा करतील आणि अतिरिक्त क्रेडिट सुविधा मिळविण्यासाठी करारावर पोहोचतील,' असे विक्रमसिंघे म्हणाले.
श्रीलंकेला अन्न, इंधन आणि विजेची तीव्र टंचाई भेडसावत असताना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी सांगितले की, 'दक्षिण आशियाई देशाची कर्जबाजारी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी देशाच्या संसदेला सांगितले की देश तेल आयातीसाठी पैसे देण्यासही सक्षम नाही, 'श्रीलंकेला इंधन, गॅस, वीज आणि अन्नाच्या अभावापेक्षाही अधिक गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.'
1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे संपूर्ण राष्ट्रामध्ये अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन यासारख्या आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जवळजवळ दिवाळखोर देश, विदेशी चलनाच्या गंभीर संकटामुळे परकीय कर्ज चुकते, एप्रिलमध्ये जाहीर केले होते की ते या वर्षासाठी 2026 पर्यंत देय असलेल्या सुमारे USD 25 अब्ज पैकी जवळपास USD 7 अब्ज विदेशी कर्ज परतफेड स्थगित करत आहेत. श्रीलंका चे एकूण विदेशी कर्ज USD 51 अब्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.