champagne Dainik Gomantak
ग्लोबल

शॅंपेनवर रशियाने दावा केल्याने फ्रान्सच्या कंपनीने केली निर्यात बंद!

रशियाने (Russia) केलेल्या एका दाव्यानुसार फक्त रशियामध्ये तयार झालेल्या वाईनलाच शॅंपेन (Champagne) म्हटले जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

मद्यप्राशन करणाऱ्या शौकीन लोकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार बुडबूड्यांच्या कोणत्याही वाईनला (Wine) तेव्हाच शॅंपेन (Champagne) म्हटल जात जेव्हा ती फ्रांसच्या एका विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट नियमांचे पालन करुन तयार केली जाते. मात्र सध्या रशियाने केलेल्या एका दाव्यानुसार फक्त रशियामध्ये तयार झालेल्या वाईनलाच शॅंपेन म्हटले जाऊ शकते. (Russia claims Champagne, French company shuts down exports)

रशियाने असा कायदाच तयार केला असुन या कायद्यामुळे मोठा वाद सुरु झाला आहे. यानंतर प्रसिद्ध वाईन निर्माता कंपनी मोएट हेनेसी ने आपन रशियाला केली जाणारी वाईनची निर्यात थांबवत असल्यची सोमवारी दिली आहे. शुक्रवारी अंमलात आलेल्या या कायद्यानुसार रशियाचीच शॅंपेन असणार आहे. रशियात बऱ्याच वर्षांपुर्वी शॅंपेनला शॅंम्पेनस्कॉय असे म्हटले जायचे.

त्याच वेळी, एका मोठ्या रशियन वाइनमेकर कंपनीने देखील कायदा योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. 'आरआयए-नोव्होस्तीच्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अब्रू-दुर्सोचे अध्यक्ष पावेल टिटोव्ह म्हणाले की, 'माझ्यासाठी' खरा 'शॅम्पेन तोच आहे जो फ्रान्सच्या शॅम्पेन भागातून आला आहे यात काहीच शंका नाही. आमच्या बाजारपेठेत रशियन वाइनचे संरक्षण करणे आणि त्यांना सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करणे फार महत्वाचे आहे परंतु मात्र त्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT