Ukrainian girl becomes India's daughter-in-law Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनियन तरुणी बनली भारताची सून; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जुळलं नातं

अॅना होरोदेत्स्का आणि अनुभव भसीन यांनी नुकतेच एकमेकांशी लग्न केले आहे.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील हल्ल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. या हल्याला आता साधारण महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीदेखील दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. रशियाने (Russia and Ukraine War) केलेल्या आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनमधील परिस्थिती भयंकर झाली आहे.

या हल्ल्यानंतर युक्रेनियन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. काही लोक अंडरग्राऊंड बॉम्ब शेल्टर्समध्ये गेले तर काहींनी इतर युरोपियन देशांमध्ये आश्रय घेतला. पण यापैकी एक मुलगी अशी होती जिला संकटाच्या काळात भारताची (India) आठवण आली. आपला जीव वाचण्यासाठी ती फक्त दोन जोडी कपड्यांसह दिल्लीला आली. आता या मुलीने तिच्या भारतीय प्रियकराशी लग्न केले आहे.

अॅना होरोदेत्स्का (Anna Horodetska) असे या युक्रेनियन मुलीचे नाव आहे. माहितीनुसार, युक्रेनची राजधानी कीव येथील रहिवासी असलेली 30 वर्षीय अॅना ऑगस्ट 2019 मध्ये भारतात आली होती. कीवमधील एका आयटी कंपनीत (IT Company) नोकरी करणारी अॅना सोलो ट्रीपसाठी भारतात आली होती. या भारत भेटीदरम्यान तिची अनुभव भसीन या तरुणाशी ओळख झाली होती. दिल्लीमध्ये राहणारा अनुभव वकील आहे. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

अॅना युक्रेनला परतल्यानंतरही दोघे व्हिडिओ कॉलच्या ते एकमेकांच्या संपर्कात होते. 2020 मध्ये अॅना अनुभवला भेटण्यासाठी पुन्हा भारतात आली होती. यावेळी तिने आपल्या एका मैत्रिणीलाही सोबत आणले होते. यावेळी दोघांनीही लग्नकरण्याचे ठरवले होते. पण कोरोनामुळे या गोष्टीला उशीर झाला. मात्र आता या हल्ल्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी ती आपल्या प्रियकराकडे परतली आणि त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. सध्या या दोघांच्या लग्नाचा विषय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: आढळले मृत डॉल्फिनचे पिल्लू

SCROLL FOR NEXT