LGBT Movement
LGBT Movement Dainik Gomantak
ग्लोबल

LGBT Movement: एलजीबीटी विरोधात पुतीन सख्त; चळवळींना मानले जाणार दहशतवादी संघटना

Manish Jadhav

Russia Added LGBT Movement In List Of Extremist And Terrorist Organisation: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच दोन दिवसांपूर्वी आयसीसने दहशतवादी हल्ला घडवून रशियाला मोठा धक्का दिला. या हल्ल्यात तब्बल 150 पेक्षा जास्त लोक मारल्याची माहिती आहे. दरम्यान, याच पाश्वभूमीवर रशियातील एलजीबीटी चळवळींना दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयएने याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी, एलजीबीटी कार्यकर्त्यांना दहशतवादी म्हणून नामित केले जावे, असा निर्णय रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या नोव्हेंबरमध्ये दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या, या नवीन आदेशानंतर, समलिंगी आणि ट्रान्सजेंडर समुदायामध्ये भीती वातावरण आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे अटक आणि खटला चालवला जाऊ शकतो. ही यादी Rosfinmonitoring नावाची एजन्सी तयार करते, ज्याला 14,000 हून अधिक लोकांची दहशतवादी म्हणून नामित करण्याची आणि संस्थांची बँक खाती गोठवण्याचे अधिकार आहेत. यामध्ये अल कायदा ते अमेरिकन कंपनी मेटा आणि दिवंगत रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा समावेश आहे. रशियन न्यूज एजन्सी आरआयएने म्हटले आहे की, नवीन याद्या "आंतरराष्ट्रीय एलजीबीटी चळवळ आणि त्याच्या संरचनात्मक युनिट्स" बद्दल आहेत.

एलजीबीटी समुदायाविरुद्ध रशियामध्ये कठोर कायदे

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाने LGBT समुदायाची ओळख आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. पुतिन एलजीबीटी चळवळीला पाश्चात्य मनोवृत्तीचे स्वरुप मानतात. रशियाने अपारंपारिक लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यास प्रतिबंध करणारे कायदे देखील पारित केले आहेत. याशिवाय, पुतिन यांच्या देशात लिंग बदलावर बंदी आहे. दुसरीकडे, युक्रेन युद्धाला पाश्चिमात्य देश जबाबदार क्रेमलिनने असल्याचे म्हटले. रशियाने 2022 मध्ये एलजीबीटीला समलैंगिक प्रोपोगंडा म्हणून बंदी घातली होती. इतकेच नाही तर पूर्वीच्या कायद्याचा विस्तार करत अल्पवयीन मुलांवरही बंदी घालण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी आणि माध्यमांमध्ये "अपारंपरिक लैंगिक संबंध" चे कोणतेही प्रतिनिधित्व प्रभावीपणे बेकायदेशीर ठरवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT