PM Modi In UAE Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi In UAE: मोदींच्या नेतृत्वात रुपयाची ताकद वाढली, UAE सोबत होणार लोकल चलनात व्यापार

Manish Jadhav

PM Modi In UAE: भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असताना दोन्ही देशांमध्ये स्थानिक चलनात व्यापार करण्यावर सहमती झाली आहे. या करारामुळे दोन्ही देशांसाठी अनेक नवीन व्यापाराच्या संधी निर्माण होणार असल्या तरी दोन्ही देशांच्या चलनांसाठीही ते फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, PM मोदींनी शनिवारी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी व्यापक चर्चा केली. या चर्चेदरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले. यापैकी एक म्हणजे दोन्ही देशांच्या स्थानिक चलनात व्यापार करण्यास सहमती.

दोन्ही देशातील व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल

भारत (India) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सध्या 85 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार आहे. तो लवकरच 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या आर्थिक भागीदारी करारानंतर भारत-यूएई व्यापार 20 टक्क्यांनी वाढला आहे, असे पंतप्रधान मोदींनी UAE अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

स्थानिक चलनात व्यवसाय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या उपस्थितीत भारत आणि UAE ने स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. पीएम मोदी म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि मजबूत आर्थिक भागीदारी दर्शवतो. स्थानिक चलनात व्यापार सेटलमेंटची व्यवस्था असल्‍याने द्विपक्षीय व्‍यापार तर वाढेलच शिवाय उभय देशांमधील गुंतवणुकीचा पाया मजबूत होईल.

दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींचे निवासस्थान 'कसर-अल-वतन' येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याचवेळी राष्ट्रपतींनी त्यांच्या स्वागतासाठी पूर्णपणे शाकाहारी दस्तरखान सजवला. गहू आणि खजूर असलेल्या स्थानिक सेंद्रिय भाज्यांपासून बनवलेले सॅलड त्यांना देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT