PM Modi-Emmanuel Macron: पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना दिलेल्या गिफ्टमधून झळकली भारतीय संस्कृती

PM Modi-Emmanuel Macron: हे संगमरवर राजस्थानच्या मकराना शहरात सापडते.
Emmanuel Macron-PM Modi
Emmanuel Macron-PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi-Emmanuel Macron: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेशी दौऱ्यांवर असून नुकतेच ते फ्रान्सवरुन आता युएईला रवाना झाले आहेत. फ्रान्समधील पंतप्रधानांचा दोन दिवसांचा दौरा य़शस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअल मॅक्रॉन यांना एक खास गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेले हे गिफ्ट आता चांगलेच चर्चेत आले आहे. मोदींनी दिलेल्या गिफ्टमधून भारतीची वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन झाल्याचे म्हटले जात आहे.

चंदनाच्या लाकडापासून बनवलेले सितारची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली असून त्यांच्या पत्नीला चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या डब्यात पोचमपल्ली रेशमाचे वस्त्र भेट देण्यात आले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांना हे गिफ्ट आवडल्याचे म्हटले आहे.

Emmanuel Macron-PM Modi
Twitter: ट्विटरच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! असे कमावले जाऊ शकतात पैसे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, मॅक्रॉन यांना दिलेल्या सितारच्या प्रतिकृतीवर ज्ञान, संगीत, कला, वाणी, बुद्धि आणि विद्येची देवता मानली जाणारी देवता सरस्वतीची चित्रे असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच, या सितारावर भगवान गणेशाचे देखील चित्र आहे.

याबरोबच, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या प्रधानमंत्री एलिजाबेथ बोर्न यांना 'मार्बल इनले वर्क टेबल' गिफ्ट केले आहे. 'मार्बल इनले वर्क' हे संगमरवरवर बनवलेली आकर्षक कलाकृती असते. हे संगमरवर राजस्थानच्या मकराना शहरात सापडते.

याशिवाय,फ्रान्सच्या संसदचे अध्यक्ष येल ब्रॉन-पिवेट यांना हातांनी विणलेले 'रेशम कश्मीरी कालीन' गिफ्ट म्हणून दिले आहे. पंतप्रधानांनी दिलेले हे सगळे उपहार भारताची संस्कृती दर्शवतात असे म्हटले जातात.

दरम्यान, फ्रान्सने पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार गौरवले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले आहे.

हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. भूतकाळात, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हे जगभरातील निवडक प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे.

यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, किंग चार्ल्स - तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, जर्मनीच्या माजी चांसलर अँजेला मर्केल, बुट्रोस बुट्रोस-घाली आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यानंतर भारत-फ्रान्स यांचे राजनैतिक आणि द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com