Iran Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Missile Attack: मोठी बातमी! इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. यातच आता इराणने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला आहे.

Manish Jadhav

इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. यातच आता इराणने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला आहे. लेबनॉनच्या हिजबुल्लाहशी दोन हात करणाऱ्या इस्त्रायलवर आता इराणनेही हल्ला चढवला आहे. बेरुतमध्ये इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर हसन नसराल्लाह आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचा एक उच्च अधिकारी मारला गेल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला आहे.

दरम्यान, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. ''थोड्या वेळापूर्वी इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायली नागरिकांना सतर्क राहण्याची आणि होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," असे परराष्ट्र मंत्रालयाच्या हँडलने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. राजधानी तेल अवीवमधील संशयित "दहशतवादी" हल्ल्याच्या वृत्तादरम्यान क्षेपणास्त्रे डागल्याची बातमी आल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये.

इराणचा हल्ले सुरुच आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत इस्त्रायली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तुम्ही जे स्फोट ऐकत आहात ते इंटरसेप्शन किंवा पडलेल्या प्रोजेक्टाइल्सचे आहेत, असे इस्त्रायली लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

SCROLL FOR NEXT