Ebola virus in Congo Dainik Gomantak
ग्लोबल

Congo मध्ये इबोला विषाणूने डोके काढले वर, 4 प्रकरणांची पुष्टी

डीआरसीने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या देशातील इबोला महामारी संपल्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमन्तक

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) च्या हिंसाचारग्रस्त पूर्व भागामध्ये इबोला विषाणूने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. या भागात इबोला विषाणूच्या (Ebola virus) संशयित प्रकरणाचा तपास अध्याप सुरू आहे. पूर्वीच्या इबोला विषाणूच्या साथीचा अंत झाल्याची WHO ने घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता इबोला विषाणूचा नवीन उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली आहे. (risk of the Ebola virus has risen again in Congo with 4 confirmed cases)

वृत्तांनुसार, डीआरसीने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या देशातील इबोला महामारी संपल्याची घोषणा केली होती. तर दोन महिन्यांनंतर, उत्तर-पश्चिम विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या प्रांतात इबोला विषाणूने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की इबोलाची चार पुष्टी आणि एक संशयित प्रकरण आहे. तर या सर्वांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, 1976 मध्ये या आजाराचा शोध लागल्यापासून, या देशात इबोला विषाणूचा हा आता 14 वा उद्रेक आहे.

उत्तर किवूच्या पूर्वेकडील भागामध्ये सोमवारी मरण पावलेली 46 वर्षीय महिला देखील इबोला विषाणूची शिकार असू शकते, अशी भीती आता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओने एका निवेदनामध्ये म्हटले आहे की सुरुवातीला बेनी शहरातील रुग्णालयात इतर आजारांसाठी उपचार करण्यात आले आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये इबोला विषाणू आजारासारखी लक्षणे दिसून आली तसेच त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

डब्ल्यूएचओचे आफ्रिकेसाठीचे प्रादेशिक संचालक मतशिदिसो मोएती यांनी एका निवेदनात म्हटले की, डब्ल्यूएचओ आधीच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि संभाव्य उद्रेकाची तयारी करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करत आहे.

सरकारने शनिवारी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आणि उत्तर किवूमध्ये लसींचा साठा असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे इबोला हा जीवघेणा विषाणूजन्य ताप आहे तर ज्यामध्ये ताप, उलट्या, रक्तस्त्राव आणि जुलाब ही मुख्य लक्षणे आहेत. DRC मधील सर्वात प्राणघातक महामारीने 2020 मध्ये 2,280 लोकांचा बळी घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT