Rishi Sunak  Dainik Gomantak
ग्लोबल

Rishi Sunak: पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचे पहिले भाषण, 'ब्रिटनच्या लोकांसाठी...'

Rishi Sunak Becoming British PM: ब्रिटनच्या इतिहासात ऋषी सुनक यांचे नाव सदैव स्मरणात राहील.

दैनिक गोमन्तक

Rishi Sunak Becoming British PM: ब्रिटनच्या इतिहासात ऋषी सुनक यांचे नाव सदैव स्मरणात राहील. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे. ऋषी सुनक यांना राजा चार्ल्स-3 च्या वतीने सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी डाउनिंग स्ट्रीटवर ब्रिटनच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, 'मी तुमच्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करेन.'

ऋषी सुनक यांचे हे पहिले विधान होते

ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भूतकाळातील चुका सुधारण्याविषयी सांगितले. पक्षाचा नेता म्हणून आज माझी निवड झाली आहे, मी तुम्हाला वचन देतो की, येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी आग्रही राहीन. मी माझ्या देशाला केवळ शब्दांनीच नव्हे तर माझ्या कामातून समृध्द करीन. मी तुमच्यासाठी काम करेन, असे सुनक आपल्या भाषणात म्हणाले. सुनक पुढे म्हणाले की, आमचे सरकार प्रामुख्याने अर्थव्यवस्था (Economy) सुधारण्यासाठी काम करेल.

सुनक यांना प्रिती पटेल यांनी साथ दिली

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या प्रिती पटेल यांनी सोमवारी ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून पाठिंबा दिला. जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर पटेल यांनी सुनक यांना पाठिंबा दिला. लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारतीय वंशाच्या माजी गृहमंत्री पटेल यांनी गेल्या महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय वंशाचे 42 वर्षीय सुनक हे एकमेव उमेदवार होते, ज्यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT