viral Video  Dainik Gomantak
ग्लोबल

झकास! 250 फुग्यांवर स्वार होऊन वधूची आकाशातून एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून 40 लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

दैनिक गोमन्तक

आजकाल लग्नसोहळ्यांमध्ये काही तरी नवीन पाहायला मिळते. तसेच सध्याच्या लग्नसोहळ्यामध्ये दिखावा अधिक पाहायला मिळतो. लग्नात होणारा खर्च आणि केलेला झगमगाट यावरून लग्न किती चांगले झाले हे लोक ठरवतात. नवीन ट्रेंडमध्ये (Trend) वधूच्या एन्ट्रीकडे खास लक्ष दिले जाते. नवरी कधी पालखीमधूल तर कधी भावांच्या खांद्यावरून मंडपात प्रवेश करते. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू आकाशातून फुग्यांच्या झोक्यावर बसून लग्नस्थळी पोहोचत असलेली दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) वरासह इतर पाहुणेमंडळी लग्नाच्या ठिकाणी आधीच पोहचले आहेत आणि ते वधूच्या येण्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी वधू पांढर्‍या ड्रेसमध्ये आकाशातून पांढर्‍या फुग्यांवर स्वार होत लग्नस्थळी येताना दिसते. सहसा ख्रिश्चनमध्ये वधू आपल्या वडिलांसोबत लग्नाच्या ठिकाणी येते. तिच्यासोबत तिचे नातेवाईक, मित्र आणि जवळचे लोक उपस्थित असतात. मात्र ही इटालियन (Italy) नववधू 250 हेलियम फुग्याच्या (Helium Balloons) मदतीने आकाशातून लग्नस्थळी आली आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तो 40 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावेळी वधूने Dolce & Gabbana वेडिंग गाऊन घातला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर sposiamovi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जे एका वेडिंग प्लॅनरचे अकाऊंट आहे. याच वेडिंग प्लॅनरचे हे भव्य लग्न आयोजित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

SCROLL FOR NEXT