Pakistan Army Brigadier Death Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: टार्गेट किलिंग! पाकिस्तानी निवृत्त ब्रिगेडियरची गोळ्या घालून हत्या; जम्मू-काश्मीरमधील आर्मी कॅम्पवरील हल्ल्यात होता हात?

Pakistan Army Brigadier Deth: पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर अमीर हमजा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Pakistan Army Brigadier Death: पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर अमीर हमजा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम भागातील लिला इंटरचेंज येथे ही घटना घडली. वृत्तानुसार, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हमजा त्यांची पत्नी आणि मुलीसोबत प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी हमजा यांच्या कारवर बेछूट गोळीबार केला. त्यांनी कार थांबवण्याचा किंवा लुटण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे हल्लेखोरांचा उद्देश केवळ हत्येचा होता, असे मानले जात आहे. ही टार्गेट किलिंग आहे.

एफआयआरमध्ये दहशतवादाशी संबंधित कलमांचा समावेश नाही

अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये दहशतवादाशी संबंधित कलमांचा समावेश नाही. पोलिसांच्या हवाल्याने या प्रकरणाचा ब्लाइंड मर्डर केस म्हणून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

लष्कराच्या छावणीवर हल्ला करण्याचा कट रचला होता

वृत्तानुसार, सेवानिवृत्त ब्रिगेडियर अमीर हमजा हे इमरजन्सी सर्व्हिसेस अकादमी 1122 चे माजी डीजी होते. जम्मू-काश्मीरमधील सुंजवान आर्मी कॅम्पवर 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ते मुख्य सूत्रधार होता, असा आरोप आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे. 10 फेब्रुवारी 2018 रोजी हा हल्ला झाला होता. ज्यामध्ये भारतीय लष्करातील 5 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 6 महिला आणि मुलांसह 10 जण जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT